शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षाांसाठी १०१ विद्यार्थी अनुपस्थित

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या ऑक्टोबर/नोव्हेंबर-२०२३ हिवाळी सत्रातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा व्यवस्थितपणे सुरु झालेल्या आहेत. Bachelor of Pharmacy, Master of Business Administration, Bachelor of Laws(Special), Bachelor of Laws(Five years), Master of Education, B.Ed.M.Ed. Integrated या ६ अभ्यासक्रमाांच्या परीक्षा वर्णनात्मक (Offline) पद्धतीने विविध महाविद्यालये व अधिविभागामध्ये सुरळीतपणे पार पडल्या असून सदर परीक्षाांसाठी २३६३ विद्यार्थ्यांपैकी १०१ विद्यार्थी अनुपस्थित होते. M.Tech.CBCS Sem.I , M.C.A. Sem. I, M.C.A. Sem.II, M.C.A. Sem.III, M.C.A. Sem.IV या पाच अभ्यासक्रमाांचे निकाल घोषीत करण्यात आले असून आज अखेर ५९६ अभ्यासक्रमाांचे निकाल घोषीत करण्यात आले आहेत.

Advertisement
students were absent from Shivaji University's Winter examinations

या परीक्षेसाठी विद्यापीठाने परीक्षेत गैरप्रकार करणा-या विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथके स्थापन केली आहेत. सदर पथकाकडून साांगली जिल्ह्यातून एका गैरप्रकाराची नोंद परीक्षा प्रमाद समितीमार्फत करण्यात आलेली आहे. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातून कोणत्याही गैरप्रकाराची नोंद परीक्षा प्रमाद समितीमार्फत करण्यात आलेली नाही. तसेच परीक्षेचे पावित्र्य राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणेच परीक्षा द्यावी, असे आवाहन संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ याांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page