स्थानिक गरजा लक्षात घेऊन संशोधन व्हावे: सिद्धार्थ शिंदे

कोल्हापूर, दि. १७ मार्च: “संशोधकांनी स्थानिक गरजा लक्षात घेऊन त्यांची पूर्ती करण्याच्या दिशेने आपले संशोधन केंद्रित करावे आणि शाश्वत विकास डोळ्यांसमोर ठेवून सृजनशीलतेचा वापर करावा,” असे आवाहन सिद्धार्थ शिंदे, राज्यपाल नियुक्त सदस्य, शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागात प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत (पीएम-उषा) संशोधक आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी “सृजनात्मक विचारांची शिक्षण पद्धती” या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन आज करण्यात आले. उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. शिंदे बोलत होते, तर वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन अध्यक्षस्थानी होते.

Research should be done keeping in mind local needs: Siddharth Shinde
????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????

श्री. शिंदे म्हणाले, “समाजाचा पैसा समाजोपयोगी संशोधनासाठी खर्च व्हावा आणि विद्यापीठासारख्या संस्थांमध्ये स्थानिक समस्यांवर आधारित संशोधन होणे आवश्यक आहे. याचबरोबर, स्थानिक गरजांनुसार अभ्यासक्रमांमध्ये देखील याचा समावेश होणे आवश्यक आहे.”

Advertisement

डॉ. महाजन यांनी अध्यक्षीय मनोगतात सृजनशील विचारसरणीच्या महत्त्वावर प्रकाश टाकला आणि सांगितले की, शिक्षकांमध्ये सृजनशीलता असेल तर ती विद्यार्थ्यांसाठी आणि उद्यमशील समाजासाठी प्रेरणादायक ठरते.

कार्यशाळेचे आयोजन शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या प्रमुख डॉ. चेतना सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानाचे समन्वयक डॉ. विद्यानंद खंडागळे यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. सुप्रिया पाटील व अंजली आंबेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

या कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना सृजनात्मक विचारांची शैक्षणिक पद्धती समजावून देणे आणि स्थानिक गरजांवर आधारित संशोधनाची महत्त्वता जागरूक करणे आहे. कार्यशाळेत विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील ८१ संशोधक आणि पदव्युत्तर विद्यार्थी सहभागी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page