श्री बंकटस्वामी महाविद्यालयातील डॉ प्रकाश कोंका यांचे संशोधनपर संदर्भ ग्रंथ युरोपमध्ये प्रकाशित
बीड : श्री बंकटस्वामी महाविद्यालयातील शिक्षण व संशोधन क्षेत्रात नवे मापदंड प्रस्थापित करणारे कार्य भूगोलशास्त्र विभागाचे प्रा डॉ प्रकाश कोंका यांनी केले असून, त्यांचे “Land Use Land Cover Change Detection Analysis of Cities” हे संशोधनपर पुस्तक लॅम्बर्ट अकॅडमिक पब्लिकेशन, युरोप येथून प्रकाशित झाले आहे.


या ग्रंथात विविध राष्ट्रीय संस्थांमध्ये त्यांनी केलेल्या शहरांवरील सखोल संशोधनाचे विवरण आहे. शहरी भूगोल आणि पर्यावरणातील बदलांचा अभ्यास करत माहिती-तंत्रज्ञानाच्या आधारे केलेल्या विश्लेषणाचा सखोल मागोवा त्यांनी या पुस्तकात घेतला आहे. संशोधन क्षेत्रात महत्त्वाची भर टाकणाऱ्या या पुस्तकाच्या प्रकाशनामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठी भर पडली आहे.या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विवेक मिरगणे व उपप्राचार्य डॉ शिवाजी मोरे यांच्या हस्ते डॉ प्रकाश कोंका यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विवेक मिरगणे यांनी देखील या यशाबद्दल गौरवोद्गार काढले तसेच या यशाबद्दल संशोधन क्षेत्रातील प्रेरणादायी कार्य संशोधन व शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचा ठसा उमटवणाऱ्या डॉ प्रकाश कोंका यांच्या कार्याचा महाविद्यालयाला सार्थ अभिमान आहे. भविष्यातही अशा संशोधनात्मक कार्याला महाविद्यालयाच्या वतीने प्रोत्साहन दिले जाईल, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विवेक मिरगणे यांनी केलेत्यांच्या पुढील शैक्षणिक व संशोधन प्रवासाला हार्दिक शुभेच्छा दिल्या.
डॉ प्रकाश कोंका यांनी देखील मला महाविद्यालय प्रशासन व संस्थेने वेळोवेळी संधी दिल्यामुळे मी हे काम यशस्वी करू शकलो त्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या प्रसंगी भूगोलशास्त्र विभागातील डॉ जे डी चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत संशोधनाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतकर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.