सोलापूर विद्यापीठात ‘दृश्यकला आणि नाट्यकलांमधील बदलते आधुनिक संज्ञाप्रवाह’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न
विद्यापीठातील ललितकला संकुलामध्ये दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील ललितकला व कलासंकुलामध्ये पीएमउषा विभाग यांच्या सहकार्याने ‘दृश्यकला आणि नाट्यकलांमधील बदलते आधुनिक संज्ञाप्रवाह’ या विषयावर दोन दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्र पार पडले.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा प्रकाश महानवर हे होते. यावेळी प्र-कुलगुरू प्रा लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, पीएमउषा विभागाचे समन्वयक डॉ प्रभाकर कोळेकर, ललितकला व कला संकुलाच्या संचालिका डॉ ज्योती माशाळे, राष्ट्रीय चर्चासत्राच्या समन्वयक प्रा श्वेता गावडे, प्रा शिवानी दहिवळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
दोन दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्रासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून सतीश नार्वेकर (गोवा), डॉ जयंत शेवतेकर (छत्रपती संभाजीनगर), डॉ विक्रम कुलकर्णी (पुणे) व संदीप डोंगरे (पुणे) हे तज्ञ उपस्थित होते. या चर्चासत्रासाठी शिक्षक, कलाकार, कलाशिक्षक हे पुणे, मुंबई, गोवा, सोलापूर, लातूर इत्यादी ठिकाणहून सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना कुलगुरू प्रा महानवर म्हणाले की, ललितकला व कलासंकुलामध्ये भविष्यात अधिकाधिक उत्कृष्ट कलाकार घडतील व त्यासाठी त्यांना चांगले व्यासपीठ मिळण्यासाठी विद्यापीठ कायम तत्पर असेल, असे सांगितले. प्रमुख व्याख्यात्यांचा परिचय प्रा अमोल देशमुख व प्रा धनंजय टाकळीकर यांनी करून दिला. दोन दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्राचा अहवाल समन्वयक श्वेता गावडे यांनी सादर केला. सूत्रसंचालन प्रा चंद्रशेखर तेलंगे यांनी केले. यासाठी प्रा विशाल सोमवंशी, प्रा संगमेश्वर बिराजदार, प्रमोद सुतकर व दिनेश शेंडगे यांचे सहकार्य लाभले.