रायसोनी कॉलेज पुणेच्या २५ विद्यार्थ्यांना कमिन्स इंडियाची शिष्यवृत्ती
पुणे : जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, पुणे येथील २५ विद्यार्थ्यांना ‘नर्चरिंग ब्रिलियन्स’ कार्यक्रमांतर्गत कमिन्स इंडिया शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. या शैक्षणिक शिष्यवृत्तीत इंजीनिअरिंगच्या चारही वर्षांच्या शिक्षणाच्या खर्चाचा समावेश असणार आहे. तसेच शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना वैयक्तिक लॅपटॉप देखील प्रदान करण्यात आले आहेत. ज्यामुळे गरिब विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आवश्यक संसाधनांचा उपयोग होणार असल्याची माहिती रायसोनी कॉलेज पुणेचे कॅम्पस डायरेक्टर डॉ आर डी खराडकर यांनी दिली.

डॉ आर डी खराडकर म्हणाले, की शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये प्रथम वर्षाच्या बी टेकचे १४ विद्यार्थी, द्वितीय वर्षाच्या बी टेकचे ७ विद्यार्थी आणि तृतीय वर्षाच्या बी टेकचे ४ विद्यार्थी समाविष्ट आहेत. रायसोनी कॉलेजच्या पीअर कौन्सिलर्स क्लबने कमिन्स इंडिया शिष्यवृत्तीवर चर्चासत्र आयोजित केले होते. यात विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रिया आणि त्याचे फायदे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले होते. रायसोनी कॉलेजच्या कौन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट सुरभी प्रणव यांनी ही शिष्यवृत्ती मिळवण्यात विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांचे कमिन्स इंडिया शिष्यवृत्तीमुळे केवळ त्यांचा आर्थिक भार कमी करणार नाही तर त्यांना त्यांच्या संबंधित क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्यास प्रेरित करेल. आम्ही शिष्यवृत्ती प्राप्तकर्त्यांचे अभिनंदन करतो आणि कमिन्स इंडियाचे आभार मानतो.
रायसोनी एज्युकेशनचे अध्यक्ष सुनील रायसोनी आणि रायसोनी एज्युकेशनचे कार्यकारी संचालक श्रेयस रायसोनी आणि कॅम्पस डायरेक्टर डॉ आर डी खरडकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे या यशाबद्दल अभिनंदन केले.