सोलापूर विद्यापीठात आणि पीएम उषा अंतर्गत “विकसित भारत 2047 शाश्वत विकासाचे मार्ग” या विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न
सामान्य व्यक्तीच्या अर्थव्यवस्थेतील योगदानानेच विकसित भारत शक्य : डॉ उपेंन्द्र कुलकर्णी
सोलापूर : ग्रामिण भागातील सर्वसामान्य व्यक्तीला कारागीर म्हणुन उत्पादन व्यवस्थते सहभागी करुन घ्यावेच लागणार आहे. या सर्वसामान्य व्यक्तीच्या अर्थव्यवस्थेतील योगदान वाढीमुळेच विकसित भारत शक्य असल्याचे प्रतिपादन दिनदयाळ संशोधन संस्थचे प्रकल्प संचालक डॉ उपेंन्द्र कुलकर्णी यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर आणि पीएम उषा अंतर्गत विकसित भारत 2047 शाश्वत विकासाचे मार्ग या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी डॉ उपेंन्द्र कुलकर्णी बोलत होते. यावेळी व्यापसपीठावर कुलगुरु प्रा डॉ प्रकाश महानवर, प्र-कुलगुरु डॉ लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगीनी घारे, सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ गौतम कांबळे, प्राचिन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ प्रभाकर कोळेकर, उपस्थित होते.




यावेळी डॉ उपेंन्द्र कुलकर्णी म्हणाले सध्या प्रचलीत असलेल्या व्यवस्थेचा अभ्यास करुन सामान्य व्यक्तीचे विकासात उद्योग धंद्याच्या माध्यमातुन योगदान वाढवावे लागणार आहे. शेती उत्पादनावर प्रक्रिया करुन शेतकर्यांचे उत्पादन वाढवता येते. त्यासाठी विद्यापीठे समाजासाठी खुली करावी लागणार आहेत. तेव्हाच विकसित भारत शक्य आहे. असेही डॉ उपेंन्द्र कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. यावेळी कुलगुरु प्रा डॉ प्रकाश महानवर म्हणाले, विकसित भारत निर्मित करण्यामध्ये सर्वसामान्य व्यक्तीचे उत्पन्न वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. अशा परिषदामधुन विकसित भारताच्या विविध विषयावर चर्चा होऊन दिशा ठरणार आहे.
यावेळी प्र. कुलगुरु डॉ लक्ष्मीकांत दामा म्हणाले, भारत देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध क्षेत्रामध्ये झपाट्याने विकास करत आहे. त्यामध्ये कृषी, आय टी, अंतराळ संशोधन क्षेत्राचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे. असे स्पष्ट केले.
यावेळी डॉ गौतम कांबळे म्हणाले, विकसित भारत 2047 या राष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातुन विविध विषयावर मांडणी आणि संशोधन पेपर सादर करण्यात आले आहेत. या सर्वाचा आढावा घेवून धोरण निर्मिती अहवाल तयार करण्यात येणार आहे. आणि तो शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी दुसर्या दिवशीच्या पहिल्या सत्रात गोखले इंस्ट्युट ऑफ इकॉनॉमिक अॅण्ड पॉलिटक्सचे डॉ प्रकाश व्हनकडे, डॉ रविंद्र गवळी, स्वंयम शिक्षण प्रयोग संस्थेच्या नसीम शेख यांनी विकसित भारत 2047 या विषयावर मांडणी केली. तर सत्राचे अध्यक्षपद डॉ बी जे लोखंडे यांनी भूषविले.
कार्यक्रमाला राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा देवानंद चिलवंत, मानव्यशास्त्र विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ वसंत कोरे, व्यवस्थापन परिषद सदस्य पद्मजादेवी मोहिते-पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा सचिन गायकवाड, प्राचार्य सी बी कोळेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ प्रभाकर कोळेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ अंबादास भास्के यांनी केले तर आभार प्रा अश्विनी पांढरे यांनी मानले.
कार्यक्रमाला प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी इम्रान शेख, बसवकुमार लंगोटे, राजेश पाटील यांनी परिश्रम घेतले.