संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात संविधान अमृतमहोत्सवी वर्षनिमित्ताने विद्यापीठात राष्ट्रीय परिसंवाद संपन्न
भारतीय संविधान सदैव ह्मदयात राहील – आमदार रवि राणा
अधिकार दिले, पण कर्तव्याचेही पालन व्हावे – बीजभाषक डॉ हरमिंदरसिंह चोप्रा
संविधानामुळे देश एकसंघ – डॉ जयराम खोब्राागडे
संविधानामुळे देशाची योग्य रीतीने वाटचाल – कुलगुरू डॉ मिलींद बारहाते
अमरावती : संविधान निर्माते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला मजबुत संविधान दिले आहे आणि ते सदैव देशवासियांच्या ह्मदयात राहील, असे प्रतिपादन आमदार रवि राणा यांनी केले. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षनिमित्ताने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ आंबेडकर अभ्यास केंद्र, डॉ बाबासाहेब आंबेडकर थॉट्स, श्री गजानन महाराज शिक्षण संस्था व नारायणराव राणा महाविद्यालय, बडनेरा येथील इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय परिसंवाद कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ मिलींद बारहाते, उद्घाटक म्हणून नागपूर येथील विज्ञान संस्थेचे डॉ जयराम खोब्राागडे, बीजभाषक मोतीलाल नेहरू विधी महाविद्यालय, खंडवाचे प्राचार्य डॉ हरमिंदर सिंह चोप्रा, श्री गजानन महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ आशीष मालू, नारायणराव राणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गोपाल वैराळे, डॉ आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ संतोष बनसोड, डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाचे समन्वयक डॉ रत्नशील खोब्राागडे उपस्थित होते.




आ रवि राणा म्हणाले, सर्वसामान्यांना लवकर न्याय मिळाला पाहिजे, यासाठी प्रत्येक जिल्ह्रास्तरावर उच्च न्यायालयाचे खंडपीठ तसेच प्रत्येक राज्यस्तरावर सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, असा संदेश या परिसंवादाच्या माध्यमातून पोहचावा.
परिसंवादाचे उद्घाटन झाल्याची घोषणा करुन डॉ जयराम खोब्राागडे म्हणाले, भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने सर्वत्र संविधानाचा जागर होत आहे व या माध्यमातून संविधान जनसामान्यांपरंय्त पोहचविले जात आहे. देश डोळ्यासमोर ठेवून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिले आणि त्यामुळेच आपण आणि आपला देश आज एकसंघ आहे. डॉ आशीष मालू म्हणाले, भारतीय संविधान देशाचा आत्मा आहे.
बीजभाषक डॉ हरमिंदरसिंह चोप्रा म्हणाले, साठ देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. संविधानाने आपल्याला अधिकार, कर्तव्ये दिलीत, परंतु आपण आपली कर्तव्ये देखील पार पाडली पाहिजेत. आपल्या खाजगी बाबी देखील संवैधानिक अधिकारामध्ये येतात. सर्वात प्रथम देशाचे संविधान, त्यानंतर अन्य कायदे आहेत. तीन तलाक असंवैधानिक असल्यामुळे ते सर्वोच्च न्यायालयाने देखील रद्दबातल ठरविल्याचे डॉ चोप्रा यांनी यावेळी सांगितले.
अध्यक्षीय भाषण करतांना कुलगुरू डॉ मिलींद बारहाते म्हणाले, संविधानामुळे आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची मूल्ये दिलीत. तर संत गाडगे बाबांनी मानवतेची मूल्ये दिली. संविधानामुळेच आज देशाची योग्य रितीने वाटचाल सुरू आहे. त्यामुळे तरुणांनी संविधानाचे जरुर वाचन केले पाहिजे. अन्य देशांमध्ये जी स्थित्यंतरे घडली, तशी आपल्या देशात नाहीत. संविधानामुळेच आपण सर्व एकसंघ आहोत असेही कुलगुरू म्हणाले.
याप्रसंगी सहायक कुलसचिव डॉ विलास काकडे यांनी रेखाटलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चित्राचे तसेच परिसंवादावर आधारित पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकर व संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन, मेणबत्ती प्रज्वलन करुन विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्वागतपर भाषण डॉ गोपाल वैराळे यांनी केले. प्रास्ताविकातून परिसंवाद आयोजनामागील भूमिक डॉ आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ संतोष बनसोड यांनी मांडली. सूत्रसंचालन डॉ अली यांनी, तर आभार डॉ रत्नशील खोब्राागडे यांनी मानले.
उद्घाटन कार्यक्रमाला विद्यापीठ अधिसभा सदस्य रविंद्र मुंद्रे, डॉ प्रशांत विघे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ नितीन कोळी, माजी परीक्षा नियंत्रक डॉ भी र वाघमारे, विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी तसेच अमरावती शहरातील गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.