आंतर विंद्यापीठ क्रीडा महोत्सव स्पर्धेत सौ. के. एस. के. महाविद्यालयाच्या खेळाडूंची सुवर्ण कामगिरी
बीड : नागपूर येथे संपन्न झालेल्या 25 व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभााजीनगर संघातून सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर येथे 25 व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आल्या होत्या. या मध्ये अॅथलेटिक्स, हॉलीबॉल, बास्केटबॉल, बॅडमिंटन, टेबलटेनीस या पाच खेळांचा समावेश होता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभााजीनगर च्या पुरूष हॉलीबॉल संघाने विजेतेपद पटकावून सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले.
या व्हॉलीबॉल संघातून सौ. के. एस. के. महाविद्यालयाचा व्हॉलीबॉल खेळाडू सय्यद जमीन सय्यद नसीर याने नेत्रदीपक कामगिरी केली. तर मैदानी स्पर्धेत विद्यापीठाकडून खेळताना महाविद्यालयाची खेळाडू कु. सुरेखा आडे हिने भालेफेक या क्रीडा प्रकारात रौप्यपदकाची कामगिरी केली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या महिला बास्केटबॉल संघातून महाविद्यालयाच्या तीन खेळाडू कु. ज्ञानेश्वरी मतकर, कु. वैष्णवी पांढरे, व कु. आरती गव्हाणे या खेळाडूनी कौतुकास्पद कामगिरी करून आपली निवड सार्थ ठरविली. या पाच खेळाडूनीं विद्यापीठाच्या क्रीडा महोत्सवात आंतर विद्यापीठ स्पर्धेत कामगिरी करून विद्यापीठाबरोबरच महाविद्यालयाचा नाव लौकिक वाढवला.
या खेळाडूंच्या संस्थेचे सचिव डॉ. भारतभूषण क्षीरसागर, संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ. दीपा क्षीरसागर, योगेश भैय्या क्षीरसागर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. व्ही. क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ. संजय पाटील देवळाणकर,उपप्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे, पदव्युत्तर पदवी विभागाचे संचालक डॉ. सतीश माऊलगे, डॉ. सुधाकर गुट्टे, कार्यालयीन अधिक्षक डॉ. विश्वांभर देशमाने, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. भागचंद सानप, उपप्राचार्य डॉ. नारायण काकडे, पर्यवेक्षक प्रा. जालिंदर कोळेकर, डॉ. शेख शहा नूर, डॉ. शेख शकील, डॉ. अमृतसिंग बिसेन तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.