पारंपारिक उपचार पध्दतींचे प्रमाणिकीकरण व एकत्रिकरण होणे महत्वाचे – प्र-कुलगुरू डॉ मिलिंद निकुंभ यांचे प्रतिपादन
नागपूर : पारंपारिक उपचार पध्दतींचे प्रमाणिकीकरण व एकत्रिकरण होणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ मिलिंद निकुंभ यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ’एम्स’ नागपूर येथे आयोजित MUHS FIST-25 परिषदेत विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ मिलिंद निकुंभ यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात आमदार परिणय फुके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यापीठाचे प्रति-कुलगुरू डॉ मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, जगाच्या विविध देशांमध्ये आदिवासी समुदायांमध्ये वेगवेगळी उपचारपध्दती केली जाते. त्या-त्या भौगोलिक परिस्थिला, वातारणाला अनुकुल ती उपचार पध्दती असते. त्या-त्या उपचार पध्दतीले महत्वपूर्ण गुणधर्माचे संशोधन करुन त्याचे एकत्रिकरण केल्यास त्यातून अनेक उपयुक्त औषधोपचार प्राप्त होऊ शकतात असे त्यांनी सांगितले.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोवा रिग्पाचे संचालक डॉ पद्मा गुरमीत यांनी सांगितले की, लडाखमध्ये सोवारिब्बा ही उपचार पध्दती प्रचलित आहे. लडाखमध्ये 90 टक्के लोक आदिवासी आहेत. आधुनिक उपचार पध्दतींचा उपचार असल्या तरी पारंपारिक उपचार पध्दतीच वापरात असल्याचे त्यांनी सांगितले.
या परिषदेत थीम: ट्रॅडिशनल हिलींग प्रॅक्टीसेस प्रमोटिंग इंटिग्रेशन – अ वे फॉरवर्ड विषयावर आयोजित चर्चासत्रात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ मिलिंद निकुंभ आणि डायरेक्टर ऑफ ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा नवी दिल्ली डॉ तनुजा नेसरी यांच्या अध्यक्षतेखाली रोल ऑफ ट्रॅडिशनल डीलर इन ट्रान्समीटेड डिसीज मॅनेजमेंट इन लायबेरिया विषयावर प्रजासत्ताक लायबेरियाचे माजी आरोग्यमंत्री डॉ जलाह विल्हेमिया मार्गदर्शन केले तसेच सोवा रिग्पा सिस्टीम ऑन मेडिसिन ऑफ पब्लिक हेल्थ फोर ट्रायबल कम्युनिटी ऑफ लडाख विषयावर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोवा रिग्पाचे संचालक डॉ पद्मा गुरमीत मार्गदर्शन केले तसेच रिसेट अॅडव्हान्सेस ऑफ इंडिजीएस मेडिसिन प्रॅक्टिस अंड रीसर्च इन श्रीलंका विषयावर कोलंबो युनिव्हर्सिटिचे प्राध्यापक पाथिरगे कमल परेरा यांनी विचार मांडले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ दर्शन दक्षिणदास यांनी केले. या कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी व विविध सहभागी मोठया संख्येने उपस्थित होते.