मिल्लिया महाविद्यालयाचा अनिल पवार याला वूशू स्पर्धेत सुवर्ण पदक
बीड : मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयातील बी ए तृतीय वर्षाचा विद्यार्थी खेळाडू अनिल बंडू पवार याने डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर व संत सावता माळी महाविद्यालय, फुलंब्री यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी संपन्न झालेल्या आंतरमहाविद्यालयीन वूशू स्पर्धेमध्ये 70-75 किलो वजन गटात सुवर्ण पदक (गोल्ड मेडल) मिळवले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने प्रथमच या वर्षापासून या खेळाचा समावेश केला आहे.
या यशाबद्दल अनिल पवार याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ सलीम बिन महाफुज, सचिव खान सबीहा मॅडम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहम्मद इलयास फाजील, क्रीडा विभाग प्रमुख तथा उपप्राचार्य डॉ सय्यद हनीफ, उपप्राचार्य प्रोफेसर हुसैनी एस एस, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ अताऊल्ला जागीरदार डॉ फारूख सौदागर, पदव्युत्तर विभागाचे संचालक प्रोफेसर फरीद अहमद नेहरी, आयक्यूएसीचे समन्वयक डॉ अब्दुल अनिस, ग्रंथपाल डॉ आमेर सलीम, करिअर कट्टाचे समन्वयक डॉ मोहम्मद आसेफ इकबाल, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रोफेसर मिर्झा असद बेग, डॉ शेख रफीक, कार्यालयीन अधीक्षक शेख रिजवान, सर्व प्राध्यापक वृंद, कर्मचारी वृंद, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.