बीड जिल्ह्यातून भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी बाळासाहेब सोलनकर यांची नियुक्ती

अभावीप मध्ये पदासाठी नाही विद्यार्थ्यांना न्याय भेटावा यासाठी काम केलं – बाळासाहेब सोलनकर

विद्यार्थी चळवळीतील संघर्षातून राजकारणात पदार्पण

बीड : विद्यार्थी चळवळीतून आपली सामाजिक आणि राजकीय वाटचाल सुरू करणाऱ्या बीड जिल्ह्यातील एक युवक आज राज्यस्तरीय राजकीय व्यासपीठावर स्थान मिळवून विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि समाजातील परिवर्तनासाठी कार्य करण्याच्या तयारीत आहे. अत्यंत दुर्मिळ खेडेगावातून येणारा हा युवक शिक्षणासाठी कोसो दूर गेला आणि आपल्या शैक्षणिक प्रगतीच्या माध्यमातून समाजात बदल घडविण्याचे ठरवले.

विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांवर काम करण्यासाठी बाजारू शैक्षणिक संस्थांना सामोरे जाताना त्याने विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्याचबरोबर, विद्यार्थ्यांच्या कौशल्याची ओळख करून त्यांना योग्य संधी कशी निर्माण होऊ शकतात, यावर विचार केला.

“विद्यार्थी हा केवळ विद्यार्थी न राहता, तो एक विचारवंत नागरिक कसा होईल, यासाठी काम करण्याचे ठरवले. यासाठी मी अनेक माध्यमांतून कार्य केले आणि आता राजकीय सत्ता प्राप्त करून राज्याच्या सामाजिक व्यवस्थेत सुधारणा करण्याचे ध्येय ठरवले,” असे युवकाने सांगितले.

Advertisement

केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजनांचे प्रचार-प्रसार करताना, भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी विभागात प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून त्याची नियुक्ती झाली आहे. ही संधी राज्यातील विद्यार्थ्यांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी त्याचा सर्वोत्तम उपयोग करण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे.

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विद्यार्थ्यांचे मुद्दे चर्चा करण्याचा माझा प्रयत्न राहील. भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेनुसार, विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवून देशाच्या समृद्धीच्या दृष्टीने कार्य करणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट आहे,” त्याने आपल्या आगामी कार्याचे योजनेतून स्पष्ट केले.

या संधीसाठी राज्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करत त्याने आपल्या कार्याची कटिबद्धतेने सुरुवात केली आहे. भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे आणि प्रदेश विद्यार्थी विभाग संयोजक रमाकांत कापसे यांचेही आभार त्याने व्यक्त केले.

आगामी काळात, भारतीय जनता युवा मोर्चाच्या मार्गदर्शनाखाली हा युवक राज्यातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करत राहील, असा ठाम विश्वास त्याने व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page