डी वाय पाटील अभियांत्रिकीच्या डॉ सुनील जे रायकर यांचे आंतरराष्ट्रीय परिषदेत 3D प्रिंटिंगवर प्रमुख वक्ता म्हणून व्याख्यान

कसबा बावडा : डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ सुनील जे रायकर यांनी रीसेंट अ‍ॅडव्हान्सेस इन मटेरियल्स अँड मॅन्युफॅक्चरिंग (ICRAMM 2024) या सहाव्या आंतरराष्ट्रीय परिषदमध्ये प्रमुख वक्ता म्हणून भाषण दिले. ही परिषद 30 – 31 डिसेंबर 2024 दरम्यान, तामिळनाडूच्या इरोड येथील वेलालर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे झाली.

Dr Sunil J Raikar of D Y Patil Engineering delivered a keynote address on 3D Printing
डॉ सुनील जे रायकर, डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय

डॉ रायकर यांनी “पॉलीमर-आधारित अ‍ॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंगचे भविष्य: मटेरियल इनोव्हेशन्स आणि स्लायसिंग तंत्रज्ञान” या विषयावर मार्गदर्शन केले. 3डी प्रिंटिंगच्या क्षेत्रात नवीन मटेरियल्सचा वापर व त्यांची क्षमता यावर सखोल प्रकाश टाकला. आधुनिक पॉलीमर मटेरियल्सच्या संशोधनामुळे उत्पादनाच्या गुणवत्तेत होणाऱ्या सुधारणा स्पष्ट केल्या. यासोबतच, नाविन्यपूर्ण स्लायसिंग तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनाची अचूकता व गती वाढवता येईल, यावर त्यांनी उदाहरणांसह चर्चा केली.

Advertisement

त्यांचे विचार केवळ तांत्रिक दृष्टीने महत्त्वाचे नव्हे, तर 3डी प्रिंटिंगमुळे उद्योगक्षेत्रात होणाऱ्या बदलांसाठी दिशादर्शक ठरतील, असे मत मान्यवरानी व्यक्त केले.

डॉ रायकर यांना संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ ए के गुप्ता, प्राचार्य डॉ संतोष चेडे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page