आरोग्य विज्ञान विद्यापीठात जिजाऊ मॉं साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात जिजाऊ मॉं साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी जिजाऊ मॉं साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील तोरणे यांनी जिजाऊ मॉं साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची माहिती दिली. याप्रसंगी नितीन काळे विनायक ढोले, दिलीप राजपूत, निलेश उबाळे, सुमित काकड, एस एन भामरे, बी एस बच्छाव, एस पी वाघ, जयवंत पाटील अधिकारी व कर्मचारी मोठया उपस्थित होते.