जागतिक हिंदी दिवसानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिंदी विभागात काव्य परिसंवाद
साहित्य सांस्कृतिक समरसतेचा आधार – नीरज व्यास
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर हिंदी विभागात जागतिक हिंदी दिनानिमित्त शुक्रवार, दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी काव्य परिसंवाद आयोजित करण्यात आला. कवींनी जगामध्ये हिंदीचा वाढता अभिमान अधोरेखित करतानाच समाजव्यवस्थेच्या विडंबनांवरही प्रहार केले. स्त्रियांच्या दुर्दशेविरोधात आवाज उठविला.
विजय शर्मा यांनी त्यांच्या साहित्यात ऐकणे आणि विणणे हे जीवनाचे मंत्र मानले. नीरज व्यास यांनी जीवनाचे व्याकरण समजावून सांगितले. डॉ लोकेंद्र सिंग यांनी त्यांच्या प्रतिकात्मक शैलीत खूप हसवले. लोकनाथ यशवंत आणि अविनाश बागडे यांनी जीवनाच्या तत्त्वज्ञान काव्याच्या रूपात मांडले.
वरिष्ठ कवी डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, डॉ. लोकेन्द्र सिंह, डॉ. राजेन्द्र पटोरिया, डॉ. नीरज व्यास, सत्येन्द्र प्रसाद सिंह, लोकनाथ यशवंत, अविनाश बागडे, नरेंद्र परिहार, डॉ. विजय शर्मा, डॉ. मधुलता व्यास, डॉ. प्रवीण जोशी, संतोष पाण्डेय ‘बादल’, डॉ. सुमित सिंह, डॉ. लखेश्वर चंद्रवंशी, श्रीकांत राय, अजय पांडे, विनय उपाध्याय यांनी त्यांच्या कवितेद्वारे मैफिल गाजवली. टीकाराम साहू ‘आजाद’ तसेच अनिल त्रिपाठी यांनी व्यंगात्मक काव्य सादर केले. संचालन अनिल मालोकार यांनी केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना हिंदी विभाग प्रमुख डॉ मनोज पांडे यांनी जगात हिंदीची वाढती स्वीकृती आणि दिशा यावर प्रकाश टाकत त्यांनी उज्ज्वल भविष्याची आशा व्यक्त केली. काव्य परिसंवादाचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले की, कविता ही संवेदनशीलतेची निर्मिती आहे. सामाजिक-सांस्कृतिक समरसतेसाठी, सामाजिक जीवनात त्याचा सतत प्रसार आवश्यक असल्याचे डॉ. पांडे यांनी सांगितले.
यावेळी डॉ. संतोष गिरहे, डॉ. एकादशी जैतवार, प्रा. जागृति सिंह, इंद्रमन निषाद यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.