संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात ३ व ४ जानेवारी रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
रासायनिक तंत्रज्ञान व भौतिकशास्त्र विभागाचे संयुक्त आयोजन
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील रासायनिक तंत्रज्ञान व भौतिकशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने ३ व ४ जानेवारी, २०२५ रोजी ‘इमर्जींग ट्रेन्डस इन सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी’ या विषयावर विद्यापीठ परिसरातील डॉ श्रीकांत जिचकार स्मृती संशोधन केंद्राच्या सभागृहामध्ये राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन ३ जानेवारी रोजी सकाळी ११:०० वाजता होणार असून उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थान कुलगुरू डॉ मिलींद बारहाते भूषविणार आहेत. समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून मॅन्युफॅक्चरिंग कंट्रोल, कोकुयो कॅमलिन कंपनी, मुंबईचे अध्यक्ष किशोर वाठे, विद्यापीठ व्य प सदस्य डॉ प्रवीण रघुवंशी यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.
या परिषदेचा समारोप 04 जानेवारी रोजी दुपारी 3:30 वा होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे, प्रमुख अतिथी म्हणून नागपूर येथील निरी चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ राजेश बिनिवाले, व्य प सदस्य डॉ रवींद्र कडू, विद्यापीठातील विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ एच आर देशमुख उपस्थित राहणार आहेत.
या राष्ट्रीय परिषदेला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ अविनाश असनारे, आयोजन सचिव डॉ गजानन मुळे, संयोजक डॉ अनिल नाईक यांनी केले आहे. सहभागासाठी अधिक माहितीकरीता संबंधितांना त्यांचेशी संपर्क साधता येईल.