एमजीएमची ‘रन फॉर हेरिटेज’ संपन्न
सर्व वयोगटातील हजारो धावपटूंनी घेतला उत्स्फूर्त सहभाग
१० कि. मी. पुरुष गटातील स्पर्धांमध्ये ग्रँडसिंग चंदेल, अंगद कन्हेरे, राकेश यादव, संतोष वाघ, भीकणराव देहाडे यांनी पटकाविला प्रथम क्रमांक
१० कि. मी. महिला गटातील स्पर्धांमध्ये अमृता गायकवाड, अश्विनी लहाणे, अर्चना जगताप, विठाबाई कछवे, मानसी कागवते यांनी पटकाविला प्रथम क्रमांक
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशनच्या ४२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे एमजीएमच्या वतीने ‘एमजीएम रन फॉर हेरिटेज २०२४ मॅरेथॉन’ चे आज सकाळी ६ वाजता एमजीएम स्टेडियम येथे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हजारो धावपटूंनी उत्साहपूर्ण वातावरणात आपला सहभाग नोंदविला. मान्यवरांनी झेंडा दाखवून ‘एमजीएम रन फॉर हेरिटेज २०२४ मॅरेथॉन’चे उद्घाटन केले. यावेळी, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास सपकाळ,महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलाचे कामांडंट विक्रम साळी, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार,अधिष्ठाता डॉ.जॉन चेल्लादुराई, क्रीडा संचालक नितीन घोरपडे, विभागप्रमुख प्रा.डॉ.दिनेश वंजारे, प्रा.डॉ.शशिकांत सिंग, संचालक, प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी, धावपटू व सर्व संबंधित उपस्थित होते.
एमजीएम मॅरेथॉनचे यंदाचे हे नववे वर्ष असून दरवर्षी मोठ्या उत्साहात नागरिक यामध्ये सहभागी होत असतात. शहरातील वारसा स्थळांबाबत जनजागृती करीत नागरिकांना या माध्यमातून एकत्रित केले जाते. शहराची असलेली ऐतिहासिक ओळख आणि ती जपण्यासाठी आपण आपल्या स्तरावर काय करू शकतो, याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी हेरिटेज रन सुरू होण्यापूर्वी धावपटूंचा वार्मअप करून घेण्यात आला. या मॅरेथॉनमध्ये पुरुष आणि महिला गटामध्ये स्वतंत्रपणे १४ ते २०, २१ ते ३५, ३६ ते ४५, ४६ ते ५५, ५६ ते ६५ या वयोगटातील सुमारे ११०० धावपटूंनी अनुक्रमे ५ आणि १० कि.मी. स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला. १० कि.मी. स्पर्धेतील पहिला गट केवळ १६ ते २० वर्ष वयोगटातील वेगळा होता बाकी ५ कि.मी. आणि १० कि.मी. स्पर्धांमध्ये सर्व गटांची वरीलप्रमाणे विभागणी करण्यात आली होती.
या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी नाममात्र शुल्क आकरलेले होते. विविध गटातील प्रथम येणाऱ्या तीन स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते मेडल आणि रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे यावेळी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. या मॅरेथॉनमध्ये विजयी खेळाडूंना एकूण १ लक्ष ६० हजार रूपयांच्या रोख पारितोषिकांचे मान्यवरांचे हस्ते वितरण करण्यात आले. ‘एमजीएम रन फॉर हेरिटेज २०२४ मॅरेथॉन’ च्या यशस्वी आयोजनामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपले योगदान दिले.
यावर्षी स्पर्धेसाठी प्रथमच ‘बिब विथ टाईम टेक्नोलॉजी’चा वापर करण्यात आला होता. यामुळे स्पर्धेचा निकाल अचूक आणि कमी वेळेमध्ये लावणे शक्य झाले. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे आपली स्पर्धेतील अचूक वेळ कळण्यास सोपे झाले. ‘एमजीएम रन फॉर हेरिटेज २०२४ मॅरेथॉन’ स्पर्धेमध्ये यावर्षी वाहतूक पोलिस, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल, ग्रामीण पोलिस, सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ तसेच संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून आलेल्या विविध स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला.
‘एमजीएम रन फॉर हेरिटेज २०२४ मॅरेथॉन’ स्पर्धेच्या यशस्वितेसाठी डॉ.सदाशिव जव्हेरी, प्रा.रहीम खान, डॉ.अमरदीप असोलकर, बालाजी शेळके, जॉय थॉमस, प्रविण शिंदे, मुक्तानंद लोंडे व सर्व संबंधितांनी आपले योगदान दिले आहे. या स्पर्धेचे सूत्रसंचालन अमृत बिराडे यांनी केले.
‘एमजीएम रन फॉर हेरिटेज २०२४ मॅरेथॉन’ स्पर्धेतील निकाल अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत.
०५ किलोमीटर पुरूष ( १४ वयोगट ते २० वर्ष )
१. लक्ष्मण पवार
२. सुमित रेगुडे
३. अनिकेत कांबळे
०५ किलोमीटर महिला ( १४ वयोगट ते २० वर्ष )
१. मनीषा पाडवी
२. अर्चना घन
३. शारदा राऊत
०५ किलोमीटर पुरूष ( वयोगट २१ ते ३५ वर्ष )
१. हर्षल जंगले
२. योगेश बोरसे
३. रामभुवन पाल
०५ किलोमीटर महिला ( वयोगट २१ ते ३५ वर्ष )
१. वैशाली राठोड
२. ज्योती राऊत
३. लक्षिता जोशी
०५ किलोमीटर पुरूष ( वयोगट ३६ ते ४५ वर्ष )
१. सुनिल सोनवणे
२. रोहिदास नागलोत
३. उमेश जगताप
०५ किलोमीटर महिला ( वयोगट ३६ ते ४५ वर्ष )
१. विश्रांती गायकवाड
२. संगीता पाचलिंग
३. शितल गांगुर्डे
०५ किलोमीटर पुरूष ( वयोगट ४६ ते ५५ वर्ष )
१. राम लिंभारे
२. भगवान कछवे
३. लालचंद सूर्यवंशी
०५ किलोमीटर महिला ( वयोगट ४६ ते ५५ वर्ष )
१. सुनीता जापूलकर
२. अपर्णा हातोलकर
३. शशिकला धानवे
०५ किलोमीटर पुरुष ( वयोगट ५६ ते ६५ वर्ष )
१. संतोष कुलकर्णी
२. अशोक क्षीरसागर
३. संपत शिंदे
०५ किलोमीटर महिला ( वयोगट ५६ ते ६५ वर्ष )
१. छाया खंडेलवाल
२. अनिता पांघळ
३. लताबाई बूकतर
——–
१० किलोमीटर पुरूष ( १६ वयोगट ते २० वर्ष )
१. ग्रँडसिंग चंदेल
२. अनिकेत जंगले
३. योगेश पडुळे
१० किलोमीटर महिला ( १६ वयोगट ते २० वर्ष )
१. अमृता गायकवाड
२. गायत्री गायकवाड
३. भाग्यश्री मोहन
१० किलोमीटर पुरूष ( वयोगट २१ ते ३५ वर्ष )
१. अंगद कन्हेरे
२. प्रकाश धनवत
३. सुरेश वाळवी
१० किलोमीटर महिला ( वयोगट २१ ते ३५ वर्ष )
१. अश्विनी लहाणे
२. अश्विनी गजभरे
३. मंजूषा बिडवे
१० किलोमीटर पुरूष ( वयोगट ३६ ते ४५ वर्ष )
१. राकेश यादव
२. अर्जुन साळवे
३. गीतेश अत्तरी
१० किलोमीटर महिला ( वयोगट ३६ ते ४५ वर्ष )
१. अर्चना जगताप
२. दिपली भोसले
३. अंजली शिंदे
१० किलोमीटर पुरूष ( वयोगट ४६ ते ५५ वर्ष )
१. संतोष वाघ
२. दीपक पाटील
३. मोहम्मद मोहिउद्दीन
१० किलोमीटर महिला ( वयोगट ४६ ते ५५ वर्ष )
१. विठाबाई कछवे
२. किर्ती काबरा
३. हर्षा कुणकुलोल
१० किलोमीटर पुरुष ( वयोगट ५६ ते ६५ वर्ष )
१. भीकणराव देहाडे
२. दिनकर शेळके
३. सुनिल सिंह
१० किलोमीटर महिला ( वयोगट ५६ ते ६५ वर्ष )
१. मानसी कागवते
२. आभा सिंग
३. माधुरी निमजे