अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी-२०२४ च्या काही परीक्षांच्या वेळापत्रकात बदल
विद्यार्थ्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी-2024 लेखी परीक्षेची वेळापत्रके विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहेत. सदर वेळापत्रकातील काही परीक्षांच्या वेळापत्रकात दुरुस्ती/सुधारित/नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे.
ज्या परीक्षांच्या वेळापत्रकांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत, त्यामध्ये बी.सी.ए. सेमि.-5 (सी.बी.सी.एस.), बी.फार्म सेमि.-1 (सी.बी.सी.एस.), बी.टेक.सेमि.-3 (एन.ई.पी.) (केमिकल टेक्नॉलॉजी अॅन्ड एफ.पी.ओ.पी.सी.), बी.एड्. सेमि.-3 (नवीन), डिप्लोमा इन सायबर सेक्युरिटी एस.-1 अॅन्ड 2 (सी.बी.सी.एस.), डिप्लोमा इऩ अप्लाईड कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी एस.-1 अॅन्ड 2 (सी.बी.सी.एस.), बी.ए. सेमि.-1 (एन.ई.पी.), बी.एस्सी. सेमि.-1 (एन.ई.पी.), बी.ई. (सर्व शाखा)/ बी.टेक. (केमिकल टेक्नॉलॉजी/एफ.पी.ओ.पी.सी./बी.टेक्स्ट. सेमि.-1 अॅन्ड 2 एन.ई.पी., एम.एस्सी. (पर्यावरण विज्ञान) सेमि.-1 (एन.ई.पी.) सुधारित अभ्यासक्रम आणि बी.ई.सेमि.- 5 व 6 आणि 7 (सी.बी.सी.एस.) इलेक्टीव्हज पेपर्स या परीक्षांच्या वेळापत्रकांत बदल करण्यात आलेले आहेत.
यासंदर्भात सर्वसंबंधित महाविद्यालये, प्राचार्य, केंद्राधिकारी, परीक्षा केंद्रांना परीक्षा विभागाकडून कळविण्यात आले असून महाविद्यालयांनी तातडीने आपल्या विद्यार्थ्यांना कळवायचे आहे. तरी विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ नितीन कोळी यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता त्यांना 9850042357 या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.