कविकुलगुरु-कालिदास-संस्कृत विश्वविद्यालयातर्फे पीएच डी संशोधन प्रवेश पात्रता परीक्षा २०२४ चे आयोजन
कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या 2024-25 करिता विद्यावारिधी (पीएच डी) करिता संशोधन प्रवेश पात्रता परीक्षा 2024 (RET- Research Entrance Exam 2024) आयोजित करण्यात आली आहे. सदर परीक्षा विश्वविद्यालयाच्या संस्कृत भाषा तथा साहित्य, शिक्षणशास्त्र, योगशास्त्र, वेदाङ्ग ज्योतिष शास्त्र, संस्कृत व्याकरण, संस्कृत वेद व संस्कृत दर्शन, हिंदू अध्ययन, कीर्तनशास्त्र, नृत्य इ विषयांकरिता 25 जानेवारी 2025 मध्ये प्रवेश पात्रता परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. यु जी सी च्या 2024 च्या नियमांनुसार पीएच् डी, मध्ये प्रवेश घेण्याकरिता संबंधित परीक्षा आवश्यक आहे.
सदर पात्रता परीक्षेसाठी आवेदनपत्र आणि परीक्षेसंबंधी माहिती कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या https://kksanskrition.digitaluniversity.ac/Content.aspx?ID=29562 या संकेतस्थळावर पीएच्डी शीर्षकांतर्गत उपलब्ध आहे. अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक सोमवार, दिनांक 5 जानेवारी 2025 आहे याची इच्छुक विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. प्रवेश परीक्षा शुल्क रू 1500/- असून ते ऑनलाईन पेमेंट लिंकद्वारे भरता येईल. परीक्षेसंदर्भातील सर्व सूचना इमेलद्वारे विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येतील.
ज्यांनी जुलै 2024 च्या (RET- Research Entrance Exam 2024) करिता अर्ज केला असेल त्यांनी पुन्हा अर्ज करू नये.