डॉ पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय येथे वैराग्यमूर्ति श्री संत गाडगे बाबा यांना अभिवादन
अमरावती : अज्ञान, अंधश्रध्दा आणि अस्वच्छता याबद्दल जागृतता निर्माण करणारे श्री संत गाडगेबाबा यांचा २० डिसेंबर रोजी पुण्यतिथी कार्यक्रम दरवर्षी सर्वत्र साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने भजन, कीर्तन, प्रवचन, श्रीमद् भागवत, हरीपाठ, सामुदायिक प्रार्थना, रोगनिदान शिबीर, अन्नदान यासारखे सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करून समाजसुधारक संत गाडगेबाबा यांना अभिवादन करण्यात येते.
श्री शिवाजी शिक्षण संस्था व्दारा संचालित डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागा अंतर्गत वैराग्यमूर्ति संत गाडगेबाबा यांचा ६८ वा पुण्यतिथी कार्यक्रम महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अनिल देशमुख तसेच वैद्यकीय अधिक्षक डॉ पवन टेकाडे, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ वसंत लुंगे, डॉ प्रसाद तोरकडी, डॉ दिपाली विधळे, डॉ विनिता निस्ताने, डॉ स्वप्निल मोहोड व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. सुरूवातीला संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजण, हारार्पण व पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.