एमजीएमच्या प्रा.निरुपमा पाटोदकर आणि प्रा.रिता पाटील यांना पी.एच.डी प्रदान

छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या डॉ.जी.वाय.पाथ्रीकर संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापिका प्रा.डॉ.निरुपमा पाटोदकर आणि प्रा.डॉ.रिता पाटील यांना पीएचडी प्रदान करण्यात आली आहे.

प्रा.डॉ. निरुपमा पाटोदकर आणि प्रा.डॉ.रिता पाटील यांनी पीएचडी प्राप्त केल्याबद्दल त्यांचे विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, प्राचार्या डॉ. प्राप्ती देशमुख व सर्व संबंधित प्राध्यापक व सहकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Advertisement

प्रा.डॉ. निरुपमा पाटोदकर यांनी ‘डेव्हलपमेंट ऑफ अ नॉव्हेल अल्गोरिथम फॉर आयडेंटीफिकेशन अँड क्लासीफिकेशन ऑफ अल्झायमर्स डिसीज ऑफ अँन इंडीव्हिजुल युजींग मॅग्नेटिक रिसोनांस इमेजिंग गाईड’ या विषयावर तर प्रा.डॉ.रिता पाटील यांनी ऑटोमेटेड डिटेक्शन ऑफ पेडिऍट्रिक ब्रेन ट्युमर युजींग मॅग्नेटिक रिसोनांस इमेजिंग मॉडेलिटीज या विषयावर आपले संशोधन केले आहे.

MGM University's Prof. Nirupama Patodkar and Prof. Rita Patil awarded Ph.D.

प्राध्यापिका प्रा.डॉ.निरुपमा पाटोदकर आणि प्रा.डॉ.रिता पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून डॉ. प्राप्ती देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आपली पीएचडी पूर्ण केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page