विवेकानंद महाविद्यालयात पदवीदान समारंभ संपन्न
ध्येयप्राप्तीसाठी स्वतःत बदल घडवावा -डाॅ .एम.डी.शिरसाठ
छत्रपती संभाजीनगर : “उद्दीष्ट स्पष्ट असतील तर यशाला सहजपणे गवसणी घालता येते. ध्येयासाठी स्वतःत संदर्भानुसार व परिस्थितीनुसार बदल घडवावा लागतो. याकरीता स्वतःमधील क्षमता ओळखायला शिका.” असे मार्गदर्शक विचार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डाॅ .एम.डी.शिरसाट यांनी मांडले. विवेकानंद महाविद्यालयात आयोजित पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ .दादाराव शेंगुळे हे होते.
प्राचार्य डा.दादाराव शेंगुळे म्हणाले की,”नवीन राष्ट्रीय शैक्षणीक धोरणामुळे सर्वच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होणार आहे. काळाच्या ओघात जो चालेल तोच टिकेल. प्रत्येकाला स्वतःला क्षमता विकसित करुन सिध्द करावे लागेल.”
व्यासपीठावर विद्यार्थी संसदेचे प्रभारी प्राध्यापक डाॅ वसंतराव निरस, उपप्राचार्या डाॅ .अरुणा पाटील, उपप्राचार्य डाॅ टी.आर.पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शर्मिष्ठा ठाकुर यांनी केले. डाॅ.पाटील यांनी आभार मानले. पाहुण्यांच्या शुभहस्ते पदवीदान समारंभ दिमाखात पार पडला.