एमजीएममध्ये अध्यापक विकास कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न
‘रोबोटिक्स अँड ऑटोमिशन’ या थीमवर आधारित तीन दिवसीय प्रशिक्षण संपन्न
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या स्कुल ऑफ इंजिनियरिंग अँड टेकनॉलॉजी तर्फे ‘रोबोटिक्स अँड ऑटोमिशन’ या थीमवर आधारित तीन दिवसीय अध्यापक विकास कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला. हा कार्यक्रम बुधवार दिनांक ११ डिसेंबर २०२४ ते शुक्रवार, १३ डिसेंबर २०२४ यादरम्यान ‘शैक्षणिक कौशल्य विकास’ या थीमवर आधारित तीन दिवसीय विद्याशाखीय विकास कार्यक्रम विद्यापीठाच्या विनोबा भावे प्रेक्षागृहात यशस्वीपणे संपन्न झाला. यावेळी, कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ.एच.एच.शिंदे, संचालिका डॉ. परमिंदर कौर, इशरे सीएसएन प्रमुख सय्यद बिलाल कादरी, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.
अशा प्रकारच्या अध्यापक विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती एकत्र येऊन ज्ञानाचे आदान प्रदान करीत असतात. याचा फायदा प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना होत असून त्यांना समकालीन अद्ययावत तंत्रज्ञानाची ओळख होते. या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये शैक्षणिक क्षेत्रातील विषयतज्ञांनी विविध सत्रांमध्ये उपस्थितांशी संवाद साधला. या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये राज्यभरातून संबंधित विद्याशाखेचे विषयतज्ञ, पी. एच. डी./ एम. फील/ संशोधक, प्राध्यापक, पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि सर्व संबंधित सहभागी झाले होते. यामध्ये शैक्षणिक क्षेत्रातील ५०, औद्योगिक क्षेत्रातील २० आणि ४० विद्यार्थ्यांनी अशा ११० लोकांनी आपला सहभाग नोंदविला होता.
तेजस आचार्य, प्रमोद पांडे, प्रदीप पाडसवान, राहुल पटले, शेखर राम, नीरज मगनानी, संदीप मुतालिक आदि वक्त्यांनी रोबोटिक्स – इमर्जिंग ट्रेंड्स, ऑटोमेशन – इमर्जिंग ट्रेंड्स, इंडस्ट्री ४. ० अँड स्मार्ट इंडस्ट्री सेट – अप, ऑटोमेशन इन हीटिंग व्हेंटिलेशन अँड एअर कंडिशनिंग (एचव्हीएसी), हॅन्ड्स – व वर्कशॉप : डेव्हलपिंग रोबोटिक्स प्रोजेक्ट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग इन रोबोटिक्स, रोबोट सिम्युलेशन अँड प्रोग्रामिंग स्टूल्स, कंट्रोल सिस्टम्स इन हीटिंग, व्हेंटिलेशन अँड कंडिशनिंग (एचव्हीएसी), इवोल्युशन ऑफ ऑटोमेशन अँड इंटिग्रेटेड बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टम इन एचव्हीएसी, इंडस्ट्रियल व्हिजिट आदि विषयांवर उपस्थितांशी संवाद साधला.
या तीन दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संचालिका डॉ. परमिंदर कौर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या तीन दिवसीय कार्यक्रमाच्या आयोजनासाठी समन्वयक जावेद सिद्दिक्की, प्रा. पियूष काळे, प्रा.विकास लोकावर, प्रा. सूर्यकांत शिंदे, प्रा. रुपाली देशमुख आदींनी यांनी अथक परिश्रम घेतले.