एमजीएम युवा महोत्सवाचे उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन संपन्न
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशनच्या ४२ व्या वर्धापन दिनानिमित्त यावर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच भाग म्हणून एमजीएम विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या युवा महोत्सवाचे उद्घाटन चिंतनगाह येथे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, सर्व अधिष्ठाता, संचालक, प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित मान्यवर उपस्थित होते.
दिवटी प्रज्वलित करून या युवा महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांनी केले. देवीच्या गोंधळात किंवा खंडोबाच्या जागरणामध्ये दिवटी सतत तेवत ठेवली जाते. त्या पारंपारिक दिवटीचे प्रज्वलन करून अभिनव पद्धतीने उद्घाटन युवा महोत्सवाचे संपन्न झाले. युवा महोत्सवात एमजीएम संस्थेच्या विविध विभागाचे युवा कलावंत सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शिव कदम यांनी केले तर आभार प्रा.राजू सोनवणे यांनी मानले.