एमजीएमच्या प्रोजेक्ट आयटूआयला नागरिकांचा शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
छत्रपती संभाजीनगर : एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रोजेक्ट आयटूआय’ अंतर्गत वरुड काझी येथे आयोजित करण्यात आलेले दुसरे मोफत आरोग्य शिबिर आज यशस्वीपणे संपन्न झाले. या शिबिरात नेत्र तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, मेडिसिन विभाग, रक्त तपासणी विभाग आदि विभागातील तज्ञ डॉक्टरांनी आपला सहभाग नोंदविला. शिबीरामध्ये गावातील १४० रुग्णांची तपासणी करण्यात आली.

तसेच, गावातील सर्वोदय शाळेमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची नेत्र विभाग आणि बाल रोग विभागाने एकत्रितपणे तपासणी केली. यामध्ये एकूण १२० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
या वेळी एमजीएमकडून प्रा.डॉ. स्नेहल ठाकरे, प्रोजेक्ट आयटूआय संचालक डॉ. रुपेश अग्रवाल, डॉ.सतीश रामपटणा, डॉ.रोहित अग्रवाल आणि एमजीएम रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी शिबीराच्या यशस्वितेसाठी उपस्थित होते. या शिबीरामुळे गावकऱ्यांना आरोग्य सेवा सुलभपणे मिळाली आणि त्यांना आरोग्य विषयक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.