राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात थर्मोडायनामिक्सच्या १३ व्या राष्ट्रीय परिषदेस प्रारंभ
थर्मोडायनामिक्सची सर्वत्र गरज – डॉ. नंदकिशोर
नागपूर : (27-10-2023) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात थर्मोडायनामिक्सच्या १३ व्या राष्ट्रीय परिषदेस गुरुवार, दिनांक २६ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रारंभ झाला. विद्यापीठाचा रसायनशास्त्र विभाग, इंडियन थर्मोडायनामिक्स सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवशीय राष्ट्रीय परिषदेचा उद्घाटनिय कार्यक्रम गुरुनानक भवन येथे पार पडला. राष्ट्रीय परिषदेचे बीज भाषण करताना आयआयटी मुंबई येथील डॉ. नंदकिशोर यांनी थर्मोडायनामिक्सची सर्वत्र गरज असल्याचे सांगितले. उद्घाटनीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माननीय प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे होते. प्रमुख अतिथी म्हणून आयआयटी मुंबई येथील डॉ. नंदकिशोर, आयआयटी चेन्नई येथील डॉ. रमेश गरदास, विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत माहेश्वरी, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.एन. एन. करडे, संयोजक डॉ. रविन जुगादे, डॉ. विजय तांगडे, डॉ. सुधाकर धोंडगे , डॉ. निरज खटी, डॉ. ममता लांजेवार , डॉ. राजेन्द्र डोंगरे हे व्यासपीठावर उपस्थित होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे शताब्दी महोत्सवी वर्ष तसेच रसायनशास्त्र विभागाचे यंदा हीरक महोत्सवी वर्ष सुरू असल्याने १३ व्या थर्मोडायनामिक्स परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय परिषदेचे बीज भाषण करताना डॉ. नंदकिशोर यांनी थर्मोडायनामिक्स विषयी संपूर्ण माहिती दिली. थर्मोडायनामिक्सची रचना, गुणधर्म, ऊर्जा, सहसंबंध आधी विस्तृत माहिती त्यांनी पीपीटीद्वारे उपस्थितांना दिली. इन्सुलिन, डीएससी प्रोफाइल, प्रोटीन्स यामध्ये असलेले थर्मोडायनामिक्सचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. औषधे निर्मितीत थर्मोडायनामिक्स कसे उपयोगी आहे, याबाबत माहिती दिली. राष्ट्रीय परिषदेत सहभागी प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. या प्रश्नादरम्यान पृथ्वीवर येणाऱ्या प्रकाशासोबत थर्मोडायनामिक्सचा कसा प्रभाव होतो, याबाबत देखील प्रश्न विचारण्यात आला होता. भारताच्या चंद्रयान मोहिमेदरम्यान याचा शास्त्रज्ञांनी अभ्यास केला असून याबाबत समर्पक उत्तर त्यांनी दिले. ऊर्जा ही नष्ट होत नसून एकीकडून दुसरीकडे परिवर्तित होते. असा थर्मोडायनामिक्सचा सर्वसाधारण सिद्धांत त्यांनी समजावून सांगितला. यावेळी अध्यक्षीय भाषण करताना प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे यांनी शास्त्रज्ञांनी समाजाच्या गरजा लक्षात घेऊन संशोधन करावे, असे सांगितले. सोबतच समाजाचा शाश्वत विकास व्हावा याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संयोजक डॉ. रविन जुगादे यांनी परिषदेसाठी ३५० प्रतिनिधींनी नोंदणी केली असून १५० पेपर प्राप्त झाल्याचे सांगितले. रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.एन. एन.करडे यांनी मार्गदर्शन करताना विभागाचा इतिहास विशद केला. त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये ६० वर्ष जुने असलेल्या विभागाच्या विकासाबाबत माहिती देताना सर्वांचा हातभार असल्याचे सांगितले. माजी शिक्षक डॉ. सहस्त्रबुद्धे यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. अधिष्ठाता डॉ. प्रशांत माहेश्वरी यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत माहिती दिली. एनइपीनूसार आयआयटीने विविध ऑनलाइन कार्यक्रम तसेच एमओओसी आदी ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केल्याची माहिती दिली. डॉ. गरदास यांनी इंडियन थर्मोडायनामिक्स सोसायटीचा (आयटीएस) इतिहास सांगितला. आयटीएसच्या विकासामध्ये नागपूरचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. आयटीएसच्या राष्ट्रीय परिषदेमध्ये दोनदा खंड पडला. मात्र, नागपूरने त्याला पुनर्जन्म दिल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. मेहजबिन हक व डॉ. मैथिली खापरे यांनी केले तर आभार डॉ. विजय तांगडे यांनी मानले.
माजी शिक्षकांचा सत्कार
राष्ट्रीय परिषदेच्या अनुषंगाने रसायनशास्त्र विभागातील ८ माजी प्राध्यापकांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यामध्ये डॉ. ए.पी. जोशी, डॉ. ए. ए. भालेकर, डॉ. जी. एस. नटराजन, डॉ. एच.डी. जुनेजा, डॉ. एल. जे. पालीवाल, डी.व्हि. पर्वते, डॉ. बी एन बेरड, डॉ. व्ही. एन. इंगळे यांचा समावेश आहे. परिषदेच्या यशस्वीतेसाठी रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. एन. एन. करडे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. सुधाकर धोंडगे, डॉ. ममता लांजेवार, डॉ. राजेंद्र डोंगरे, संयोजक डॉ. रविन जुगादे, संयोजक सचिव डॉ. विजय तांगडे, कोषाध्यक्ष डॉ. निरज खटी, सदस्य डॉ. सिद्धार्थ मेश्राम, डॉ. असर अहमद यांचा समावेश आहे. डॉ. के. एन. मुन्शी, डॉ. एन. पी. जोशी, डॉ. व्ही.एन. इंगळे, डॉ. एन. एस. भावे, डॉ. ए. ए . भालेकर , डॉ. ए. एन. गर्ग, डॉ. एच . डी. जुनेजा, डॉ. डी.व्ही. पर्वते, डॉ. जी. एस. नटराजन, डॉ. एल. जे. पालीवाल, डॉ. बी. एन. बेरड, डॉ. एम. के. एन. येंकी यांचे सहकार्य लाभत आहे.