बालाजी अमाईन्सच्या सामाजिक जबाबदारीतून सोलापूर विद्यापीठाला ४१ आसनक्षमता असलेली बस भेट
बालाजी अमाईन्सच्या मदतीचा हात विद्यापीठाच्या विकासाला पूरक – कुलगुरु प्रा प्रकाश महानवर
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्रगतीसाठी समाजातील प्रत्येक घटकाने सामाजिक जबाबदारीतून मदत करावी. अशा मदतीमधूनच विद्यापीठाबद्दल आपलेपणाची भावना वाढीस लागेल. सोलापूर शहरातील प्रसिध्द उद्योजक राम रेड्डी यांनी त्यांच्या बालाजी अमाईन्सच्या सामाजिक जबाबदारीतून विद्यापीठाला बस भेट देवून मदतीचा हात दिला आहे. बालाजी अमाईन्सच्या मदतीचा हात विद्यापीठाच्या विकासाला पूरक ठरेल असा विश्वास कुलगुरु प्रा प्रकाश महानवर यांनी व्यक्त केले.
बालाजी अमाईन्सच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास ४१ आसनक्षमता असलेली आयशर स्कायलाईन बस देण्यात आली. या बसची चावी बालाजी अमानईन्सच्या प्रतिनिधीकडून कुलगुरु महानवर यांना प्रदान करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ प्रकाश महानवर यांनी बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी आणि त्यांचे संचालक मंडळ यांचे विद्यापीठाला बस दिल्याबद्दल आभार मानले. तसेच बालाजी अमाईन्स आणि सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थी हिता करिता इन्कूबेशन आणि इनोव्हेशन मार्फत स्टार्टअप करिता सुविधा निर्माण करण्याची घोषणा केली.
यावेळी व्यासपीठावर बालाजी अमाईन्सचे सीएसआर तांत्रीक सल्लागार मल्लीनाथ बिराजदार, जनरल मॅनेजर जी आर मेनचेकर, रवी जील्ला, विनय दुर्गम, प्र-कुलगुरु प्रा लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे उपस्थित होते.
यावेळी बोलताना कुलगुरु म्हणाले, विद्यापीठाच्या विकासासाठी समाजातील उद्योजक, दानशुर व्यक्तींनी सामाजिक जबाबदारीतुन मदत करावी. यावेळी मल्लीनाथ बिराजदार यांनी सीएसआर अंतर्गत सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात झालेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्र-कुलगुरु प्रा लक्ष्मीकांत दामा यांनी केले. सूत्रसंचलन डॉ तेजस्वीनी कांबळे यांनी केले. तर आभार कुलसचिव योगीनी घारे यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा देवानंद चिलवंत, प्रा सचिन गायकवाड, क्रिडा संचालक अतुल लकडे, वित्त अधिकारी सीए महादेव खराडे, सिनेट सदस्य डॉ विरभद्र दंडे, परिक्षा नियंत्रक डॉ श्रीकांत अंधारे विद्यापीठातील विविध संकुलाचे प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.