संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रासेयो स्वयंसेवकांना विविध साहस प्रकारातील प्रशिक्षण
साहसी शिबिरात विद्यापीठ चमूने केले महाराष्ट्राचे नेतृत्व
नागपूर : राष्ट्रीय सेवा योजना आणि अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ मौंटेनीरिंग अँड अलाइड स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे २७ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२४ दरम्यान राष्ट्रीय स्तरावर दहा दिवसीय साहसी शिबीर पार पडले. राष्ट्रीय सेवा योजना चमुने साहसी शिबिरात महाराष्ट्राचे नेतृत्व केले.
या साहसी शिबिरात देशातील महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ, पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळ आणि पॉंडिचेरी अश्या एकूण सात राज्यातील ७० स्वयंसेवक आणि ७ कार्यक्रम अधिकारी यांनी सहभाग घेतला. या साहसी शिबिरात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे एकूण ६ स्वयंसेवक सेजल शेंडे, पायल धुर्वे, मयुरी पखाले, आयुष पाटील, सैयम जैन, गोपाल झा आणि संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे एकूण ४ स्वयंसेवक मंगेश खोडे, युवराज कदम, आचल आडे, उर्मिला काळे यांनी केले.
कायाकिंग, रिव्हर राफ्टिंग, स्विमिन्ग, रिव्हर क्रॉसिंग, ट्रेकिंग, रॅपलिंग, जुमारिंग, रोप क्नॉट प्रकार, स्ट्रेचर मेकिंग, CPR देणे असे इ. प्रकार स्वयंसेववकाना शिकवण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचा आणि इतरांचा जीव वाचविण्याच्या विविध पद्धती शिकविण्यात आल्या. सर्व स्वयंसेवकांनी उत्कृष्टरित्या शिबीर पूर्ण केल्याबद्दल त्यांना साहसी बॅज आणि प्रमाणपत्र देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य पथकाचे नेतृत्व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत धनवटे नॅशनल कॉलेजचे कार्यक्रम अधिकारी प्रा. नितिन कराळे यांनी केले. साहसी शिबीर यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माननीय प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. राजेंद्र काकडे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे आणि राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांनी सर्व स्वयंसेवक आणि कार्यक्रम अधिकारी यांचे अभिनंदन केले आहे.