फसवणूक टाळण्यासाठी आर्थिक साक्षरता गरजेची – अमोघ वर्षा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘ऑनलाईन फ्रॉड ‘जनजागृती कार्यशाळा
छत्रपती संभाजीनगर, दि.२७ : केवळ लेखन-वाचनापुरती साक्षरता असून चालत नाही तर ‘ऑनलाईन’ फसवणूक टाळण्यासाठी आर्थिक साक्षरतेचे प्रमाण वाढण्याची गरज आहे, असे प्रतिपादन रिझव्र्ह बॅकचे ऑफ इंडिया मॅनेजरचे अमोघ वर्षा यांनी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील लेखा विभागाच्या वतीने ‘ऑनलाईन पेमेंट आणि ऑनलाईन फ्रॉड ‘ या विषयावर शुक्रवारी (दि.२७) कार्यशाळा घेण्यात आली. ‘रिझव्र्ह बॅक ऑप इंडिया’च्या वतीने देशभर ‘इलेक्ट्रानिक बँविंâग अवेअरनेस अॅण्ड ट्रेनिंग’ ई-बात या उपक्रमातंर्गत महात्मा पुâले सभागृहात कार्यशाळा झाली. कुलसचिव डॉ.भगवान साखळे अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्र.वित्त व लेखाधिकारी प्रदीपकुमार देशमुख, अधिसभा सदस्य तथा देवगिरी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे, उपकुलसचिव डॉ.संजय कवडे, सहायक कुलसचिव माधव वागतकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच ‘रिझव्र्ह बँके’चे अमोघ वर्षा (टी.एच, मॅनेजर, मुंबई कार्यालय) व आनंद कन्याल (असिस्टंट मॅनेजर) हे तज्ज्ञ म्हणून उपस्थित होते. उद्घाटनपर भाषणात कुलसचिव डॉ.भगवान साखळे म्हणाले, गेल्या काळी वर्षात ‘ऑनलाईन’ आर्थिक व्यवहाराचे प्रमाण मोठया प्रमाणावर वाढले आहे. तसेच यामध्ये ग्राहकांची फसवणुकीच्या घटनाही वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वांनीच सावधानाता बाळगणे गरजेचे आहे. तर लोकांमध्ये पैशाची लालच वाढली असून पैसा कमाविण्याच्या या वृत्तीतूनच ‘प्रâाँड’ वाढत आहेत, असे किशोर शितोळे म्हणाले. तर कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागाने गेल्या चार वर्षात सर्व व्यवहार ऑनलाईन केले असून आर्थिक शिस्त लावण्याचे वित्त व लेखाधिकारी प्रदीपकुमार देशमुख यांनी प्रास्ताविकात सांगितले. डॉ.संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन तर कक्षाधिकारी गणेश खरात आभार यांनी केले. विद्यापीठातील कर्मचारी यावेळी घेतलेल्या प्रश्न मंजुषा स्पर्धेत नरेंद्र मोदी, नारायण पवार व उदय नलावडे हे विजेते ठरले.
‘रिझर्व्ह बँके’कडून जनजागृती
गेल्या काही वर्षात सर्वाधिक आर्थिक व्यवहार हे ‘ऑनलाईन पध्दतीने होत आहेत. त्यामुळे फसवणुकीच्या घटना वाढल्या असून रिझर्व्ह बॅकेच्या वतीने देशभर जगजागृती कार्यक्रम