अमरावती विद्यापीठाचा संत गाडगे बाबा सामाजिक कार्य पुरस्कार – २०२४ ‘नंददीप फाऊंडेशन’ ला जाहीर
१९ डिसेंबर रोजी पुरस्काराचे वितरण
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा कै नागोरावजी जयरामजी मेटकर स्मृतिप्रित्यर्थ श्री संत गाडगे बाबांच्या दशसूत्रीत नमूद संदेशाप्रमाणे केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल दिला जाणारा ‘श्री संत गाडगे बाबा सामाजिक कार्य पुरस्कार २०२४’ जाहीर झाला आहे.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने स्व द ना उपाख्य बबनराव मेटकर यांचेकडून प्राप्त झालेल्या दाननिधीमधून कै नागोरावजी जयरामजी मेटकर स्मृतिप्रित्यर्थ ‘श्री संत गाडगे बाबा सामाजिक कार्य पुरस्कार – २०२४ ’यावर्षी यवतमाळ येथील नंददीप फाऊंडेशन ला घोषित झाला आहे.
संत गाडगे बाबांच्या दशसूत्रीनुसार सामाजिक कार्य करणारी नंददीप फाऊंडेशन ही संस्था असून आतापर्यंत अनेक समाजपयोगी कार्य या संस्थेने केले आहे. सामाजिक कार्यासाठी ही संस्था सातत्याने कार्यरत आहे. दि १९ डिसेंबर रोजी विद्यापीठामध्ये आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार ससन्मान प्रदान केल्या जाणार आहे.