सौ.के.एस.के.महाविद्यालयात महामानवास अभिवादन

बीड :  सौ.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात   विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस  महापरिनिर्वाण दिना निमित्त प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर यांनी पुष्पहार अर्पण करून नम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी डॉ.प्रेमचंद सिरसाट  यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकताना म्हणाले की, डॉ.बा बासाहेब आंबेडकर हे विश्वाचे आधारस्तंभ आहेत.त्यांनी शिक्षणाचा आदर्श घडविला.समाजातील दिन-दलित  पिडीत लोकांसाठी मोठे कार्य केले. त्यामध्ये महिलांसाठी स्वातंत्र्य तसेच मंजूरमंत्री असताना मजुराच्या अडचणी लक्षात घेत त्या सोडविल्या व राज्यघटना निर्मितीसारखे महत्वाचे कार्य केले.

Advertisement

यावेळी महाविद्यालयातील  पदव्युत्तर पदवी विभागाचे संचालक डॉ.खान ए.एस., कमवि उपप्राचार्य काकडे एन.आर.,पर्यवेक्षक प्रा.जालिंदर कोळेकर, डॉ्र.सुधाकर गुट्टे, कार्यालयीन अधिक्षक डॉ.विश्वांभर देशमाने आदी उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.प्रेमचंद सिरसट यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.पल्लवी इरलापल्ले यांनी केले.तर आभार डॉ.अनिता शिंदे यांनी मानले.या कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page