गोंडवाना विद्यापीठात डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात ६ डिसेंबर २०२४ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ११:०० वाजता विद्यापीठ सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कुलगुरु डॉ प्रशांत बोकारे यांनी भूषविणार आहेत.
या कार्यक्रमात डॉ प्रकाश राठोड, प्राचार्य, शांती विद्या भवन कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, डिगडोह, नागपूर हे “आंबेडकरांचा राष्ट्रवाद” या विषयावर तर प्रा सुशिल मेश्राम, मराठी विभाग प्रमुख, सेवादल महीला महाविद्यालय, नागपूर हे “आंबेडकरवाद आणि अवयवदान” या विषयावर व्याख्यान देणार आहेत. या कार्यक्रमाला डॉ श्रीराम कावळे, प्र-कुलगुरु हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
विद्यापीठातील सर्व सांविधानिक अधिकारी, अधिकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी आणि पदव्युत्तर विभागातील सर्व विद्यार्थी यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.