सहाय्य निधीतून विद्यार्थ्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची आर्थिक मदत

विद्यार्थ्यांना २ जानेवारी २०२५ पर्यंत करता येणार अर्ज

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना विद्यार्थी सहाय्य निधीतून आर्थिक मदत केली जाते. याकरिता विद्यार्थ्यांकडून २ जानेवारी २०२५ पर्यंत अर्ज मागविण्यात आले असल्याची माहिती विद्यार्थी विकास विभाग प्रभारी संचालक डॉ. विजय खंडाळ यांनी दिली आहे.

Advertisement
RTMNU GATE

विद्यापीठ शैक्षणिक विभाग, संचलित व संलग्नित महाविद्यालयातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना विद्यार्थी सहायता निधीमधून शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, वसतीगृह भाडे व जेवणाचा खर्च आदींसाठी आर्थिक मदत करते. वरील निधीतून आर्थिक सहायता घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांचे विहित आवेदन पत्र आवश्यक कागदपत्रांसह विद्यार्थी विकास विभाग संचालक यांचेकडे ३ डिसेंबर २०२४ ते २ जानेवारी २०२५ पर्यंतच्या कालावधीत प्राचार्य, विभाग प्रमुख, संचालक यांचे मार्फत सादर करावे याची आहे. अर्जासोबत आई, वडिलांचे, पालकांचे सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले २०२४-२०२५ वर्षातील उत्पन्नाचे मूळ प्रमाणपत्राची प्राचार्य, विभाग प्रमुखाद्वारे साक्षांकित केलेली प्रत, मागील उत्तीर्ण झालेल्या परीक्षेच्या गुणपत्रिकेच्या प्राचार्य विभागपमुखांद्वारे साक्षांकित केलेली प्रत, आवश्यक प्रमाणपत्रे व पावत्यांच्या प्राचार्य विभाग प्रमुखांद्वारे साक्षांकित केलेल्या झेरॉक्स प्रती तसेच संलग्नित पत्र प्राचार्यांनी आवेदन पत्रासोबत भरून पाठवायचे आहे. आवेदनपत्र अपूर्ण भरले असल्यास किंवा आवेदन पत्रासह आवश्यक प्रमाणपत्रे व नमूद केलेली कागदपत्रे न पाठविल्यास संबंधितांचे अर्ज अमान्य केले जातील. भरावयाचा अर्ज नमुना व माहिती विद्यापीठाच्या www.nagpuruniversity.ac.in (Student corner/student development) संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांनी घेण्याचे आवाहन विद्यापीठाचे माननीय प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे, प्रभारी प्र-कुलगुरु डॉ. राजेंद्र काकडे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. विजय खंडाळ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page