यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात एम.ए. (इतिहास) शिक्षणक्रमाचे प्रवेश सुरु
नाशिक : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार विकसित केलेल्या एम. ए. (इतिहास) या शिक्षणक्रमाचे प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्यात आले आहेत. या शिक्षणक्रमासाठी विद्यापीठाने १७५ अभ्यासकेंद्रे सुरु केली आहेत. UPSC, MPSC तसेच इतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना हा शिक्षणक्रम पूरक आणि उपयुक्त असा आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी प्राप्त केलेले विद्यार्थी या शिक्षणक्रमाच्या प्रवेशास पात्र आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकषानुसार विद्यार्थ्यांना आपल्या पारंपरिक विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी सोबतच मुक्त विद्यापीठाचा एम. ए. (इतिहास) हा पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम पूर्ण करता येतो. अभ्यासकेंद्रावरून संपर्कसत्राची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या जवळच्या अभ्यासकेंद्रांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेशाची अंतिम मुदत ३० सप्टेंबर, २०२३ ही आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या जवळचे अभ्यासकेंद्र निवडून आपला प्रवेश निश्चित करावा.
तरी विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा फायदा घेऊन स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्याचे स्वप्न पूर्ण करावे असे आवाहन मुक्त विद्यापीठातर्फे करण्यात येत आहे.