साऊथ वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ संघास विजेतेपद

गुंटूर, आंध्र प्रदेश : आचार्य नागार्जुन विद्यापीठ, गुंटूर येथे आयोजित साऊथ वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या महिला संघाने उल्लेखनीय कामगिरी करत सर्वसाधारण विजेतेपद (Winner Championship) पटकावले. संघाने स्पर्धेत एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकत चमकदार यश मिळवले. याचबरोबर, संघातील सर्व दहा खेळाडूंची निवड सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या अखिल भारतीय अंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी झाली आहे, ज्यामुळे संघाचे यश आणखी झळाळून उठले आहे.

Advertisement
Shivaji University team wins title in South West Zone Inter University Women's Weightlifting Championship

पदक विजेते खेळाडू

  • काजल सरगर – सुवर्ण पदक
  • भूमिका मोहिते – रौप्य पदक
  • निकिता कमलाकर – कांस्य पदक

उल्लेखनीय कामगिरी करणारे खेळाडू

  • सरिता सावंत – चौथ्या क्रमांकावर
  • राजनंदिनी आमणे – चौथ्या क्रमांकावर
  • प्राजक्ता साळुंखे – पाचव्या क्रमांकावर
  • साक्षी संदुगडे – सातव्या क्रमांकावर
  • अपेक्षा ढोणे – आठव्या क्रमांकावर
  • राजलक्ष्मी पवार – बाराव्या क्रमांकावर
  • स्नेहा आमणे – चौदाव्या क्रमांकावर

मार्गदर्शनाचा महत्त्वाचा वाटा

शिवाजी विद्यापीठाच्या खेळाडूंना कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र कुलगुरू डॉ. पी. सी. पाटील, रजिस्ट्रार डॉ. व्हि. एन. शिंदे, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, प्रशिक्षक डॉ. प्रशांत पाटील आणि डॉ. रवींद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.

शिवाजी विद्यापीठाच्या संघाने आपली गुणवत्ता आणि कौशल्य सिद्ध करताना विद्यापीठाचा झेंडा उंचावला. या यशामुळे विद्यापीठाची ख्याती राष्ट्रीय स्तरावर वाढली असून, सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page