शिवाजी विद्यापीठात नॅसकॉमच्या सहकार्याने “डेटा अँड फंक्शनल नॉलेज” सेमिनार

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने नॅसकॉमच्या सहकार्याने “डेटा अँड फंक्शनल नॉलेज” या महत्त्वपूर्ण विषयावर तृतीय व चतुर्थ वर्षातील कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन शाखेतील विद्यार्थ्यांसाठी सेमिनार आयोजित केला. कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून अभिषेक राठी (फाउंडर आणि सीईओ, विक्रेटिक टेक्नॉलॉजी) यांनी सहभागी विद्यार्थ्यांना डेटा विश्लेषण आणि फंक्शनल ज्ञानाचे महत्त्व विशद केले. त्यांनी विद्यार्थ्यांना संदेश दिला की, “तांत्रिक कौशल्यांसह डेटा विश्लेषणावर योग्य पकड मिळवली, तर करिअरमध्ये अनेक संधी उघडल्या जातील.

दुसऱ्या सत्रामध्ये सॉफ्ट स्किल्सविषयी प्रात्यक्षिके व सखोल मार्गदर्शन झाले.नॅसकॉमच्या सहकार्याने शिवाजी विद्यापीठ उद्योग आणि शिक्षण यामधील अंतर कमी करण्यासाठी कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

Advertisement
"Data and Functional Knowledge" seminar at Shivaji University Kolhapur in collaboration with NASSCOM

कार्यक्रमाला कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील आणि कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.
तसेच, डॉ. गणेश पाटील (ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर) यांनी या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष प्रयत्न केलेया कराराअंतर्गत यापूर्वी “जनरेटिव्ह आणि प्रॉम्प्ट इंजिनियरिंग” या विषयावर डॉ. अमित आंद्रे (फाउंडर आणि सीईओ, डेटाटेक लॅब, पुणे) यांनी सत्र घेतले होते.

प्रभारी संचालक प्रा. डॉ. पी. डी. पाटील यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्य प्रदान करून त्यांना उद्योग क्षेत्रात यशस्वी बनवणे हे शिवाजी विद्यापीठाचे मुख्य ध्येय आहे.”

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन डॉ. चेतन आवटी आणि प्रा. अमर डूम यांच्या अथक प्रयत्नांमुळे शक्य झाले.

शिवाजी विद्यापीठाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांना नवीन कौशल्ये आत्मसात करून उद्योग क्षेत्राशी अधिक घट्ट जोडण्यासाठी दिशादर्शक ठरला आह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page