महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा

संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन

संविधान जनजागृती रॅलीचे आयोजन

वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयात मंगळवार 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. सकाळी 10:00 वाजता प्रशासकीय भवनात शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, शोधार्थी व विद्यार्थ्यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्‍यात आले. कुलगुरू प्रो कृष्ण कुमार सिंह यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले, त्याची पुनरावृत्ती उपस्थितांनी केली. याप्रसंगी कुलसचिव प्रो आनन्‍द पाटील, प्रो हनुमान प्रसाद शुक्ल, प्रो कृपा शंकर चौबे, प्रो गोपाल कृष्ण ठाकुर, प्रो बंशीधर पांडे, प्रो जनार्दन कुमार तिवारी, डॉ अनवर अहमद सिद्दीकी, डॉ रामानुज अस्थाना, डॉ बालाजी चिरडे, डॉ जयंत उपाध्याय, आनन्‍द भारती, डॉ प्रकाश नारायण त्रिपाठी, विनोद वैद्य, डॉ राजेश्वर सिंह, राजेश अरोड़ा, राजेश यादव, बी एस मिरगे यांच्यासह शिक्षक, अधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यानंतर संविधान जनजागृती रॅली काढण्यात आली. कुलगुरू प्रो सिंह यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचे उद्घाटन केले. ही रॅली गांधी हिल्स, छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार, पंजाबराव देशमुख कॉलनीमार्गे विश्‍वविद्यालयात पोहोचली. रॅलीचा समारोप डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी अकादमिक भवन येथे झाला.

Advertisement

रॅलीमध्ये ‘संविधान है देश की शान, यही बनाता भारत महान’, ‘संविधान की शक्ति पहचानो, अपने अधिकारों को जानो’, ‘जिसने दिया हमें अधिकार, उसकी रक्षा करना है हमारा कर्तव्‍य बार-बार’, ‘लोकतंत्र की पहचान है, संविधान हमारी जान है’, ‘संविधान का सम्‍मान करों, भारत का उत्‍थान करों’ आदी घोषणा देण्यात आल्या.

रॅलीच्‍या यशस्वीतेसाठी डॉ युवराज खरे, डॉ दिव्या शुक्ला, डॉ परमानन्‍द राठोड, डॉ अभिषेक त्रिपाठी, डॉ विजय कुमार सिंह, डॉ अभिषेक सिंह, संगीता मालवीय, हेमंत दुबे, मिथिलेश राय, सुधीर खरकटे, राकेश झाडे, पीयूष लांबाडे आदींनी सहकार्य केले.

केंद्र सरकारने भारतीय राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ वर्षभराचा ऐतिहासिक उत्सव सुरू करण्याची घोषणा केली आहे. हा एक मैलाचा दगड आहे जो आपल्या लोकशाहीचा उल्लेखनीय प्रवास आणि आपली मूलभूत तत्त्वे आणि घटनात्मक मूल्यांचा चिरस्थायी वारसा प्रतिबिंबित करतो. संविधान दिनाच्या मोहिमेचे घोषवाक्य ‘आमचे संविधान आमचा अभिमान आहे’ आणि त्यामध्ये अंतर्भूत असलेल्या मूलभूत मूल्यांचा पुनरुच्चार करून संविधान निर्मात्‍यांच्या योगदानाचा गौरव करणे हा यामागचा उद्देश आहे.

26 नोव्हेंबर 1949 रोजी, भारतीय संविधान सभेने भारतीय राज्यघटना स्वीकारली, जी 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली आणि भारतीय इतिहासातील एका नवीन युगाची सुरुवात झाली. हा दिवस महत्त्वाचा आहे, या दिवशी भारताच्या लोकशाही व्यवस्थेचा कणा असलेल्या जगातील सर्वात मोठ्या लिखित संविधानाचा स्वीकार करण्यात आला. गेल्या 75 वर्षांत, संविधानाने देशाच्या प्रगतीला आकार देणारी मार्गदर्शक चौकट म्हणून काम केले आहे. यानिमित्त भारत सरकारने एक विशेष वेबसाइट constitution75.com विविध कार्यक्रम आणि उपक्रमांद्वारे नागरिकांना संविधानाच्या वारशाशी जोडण्यासाठी तयार केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page