ज्ञानगंगा सर्वसामान्यांच्या दारी पोहचली पाहिजे – कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे

नाशिक : मुक्त विद्यापीठाच्या वतीने यशवंत दत्तक ग्राम घनशेत येथे दिनांक २२/०८/२०२३ रोजी लायन्स क्लब सिन्नर यांच्या माध्यमातून डिजिटल एज्युकेशन कीट घनशेत येथील अंगणवाड्यांना वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे उपस्थित होते. यावेळेस मार्गदर्शन करतांना कुलगुरू म्हणाले की ज्ञानगंगा सर्वसामान्यांच्या दारी व घरोघरी पोहचली पाहिजे या बदलत्या परिस्थितीनुसार शिक्षणपद्धती बदलेली आहे. नवीन शैक्षणिक धोरणांनुसार समाजातील नवीन पिढीला सर्व स्तरीय विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देणे ही काळाची गरज आहे.

Advertisement
Gyan Ganga should reach the door of common people - YCMOU Vice-Chancellor Prof. Sanjeev Sonwane

लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी यांनी असा नवीन उपक्रम सुरू करून अंगणवाडीसाठी दिलेले एज्युकेशन कीट हे बदलत्या शिक्षणपद्धतीत अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच लायन्स क्लबचे उद्दिष्टे  अतिशय स्तुत्य आहे यापुढेही अशीच शिक्षणाची गंगा सामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम लायन्स क्लबने करावे.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लायन्स क्लब चे अध्यक्ष श्री. सोपान परदेशी यांनी केले. सूत्रसंचालन श्री. कैलास मोरे यांनी केले. या कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्रा. राजेंद्र वाघ, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. शाम कडूस, लायन्स क्लब ट्रस्टचे अध्यक्ष श्री. हेमंत वाजे, श्री. सुदाम वाळके, घनशेतचे सरपंच श्रीमती शांताबाई चौधरी, माजी सरपंच श्री. विनायक महाले, श्री. कैलास चौधरी, श्री. रवी चौधरी, अंगणवाडी शिक्षिका, गावंदचे सरपंच श्री. धनराज ठाकरे, कुळववंडीच्या सरपंच श्री. सहारे, घनशेत करिअर अकॅडमीचे सर्व विद्यार्थी यावेळेस उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page