एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी मध्ये २९वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे उद्घाटन
पुणे : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, आणि संत श्री ज्ञानेश्वर-संत श्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने, युनेस्को अध्यासना अंतर्गत २४ ते ३० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत २९वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमाला एमआयटी डब्ल्यूपीयूच्या संत श्री ज्ञानेश्वर सभागृह, कोथरूड, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे.
या समारंभासाठी संत एकनाथ महाराजांचे १४ वे वंशज ह भ प श्री योगीराज महाराज गोसावी पैठणकर व उज्जैनचे आध्यात्मिक गुरू व लेखक पंडित विजयशंकर मेहता हे सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी जगविख्यात संगणक शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ विजय भटकर हे असतील.
एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा डॉ विश्वनाथ दा कराड तसेच, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड व एमआयटी एडीटीचे कार्याध्यक्ष डॉ मंगेश तु कराड हे उपस्थित राहणार आहेत.