डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे पहिले किडनी प्रत्यारोपण यशस्वी 

दिवाळीच्या महिन्यात बहिणीने दिली भावाला किडनी भेट

अमरावती : स्थानिक डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृति वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अमरावती येथे पहिली किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. भुसावळ येथील मध्यमवर्गीय कुटुंबातील रहिवाशी मनीष कुंदन कश्यप वय वर्ष 34 या रुग्णाला त्याची बहीण मध्य प्रदेश येथील बुन्हानपूर रहिवासी चंचल सचिन सिकरवार वय वर्ष 37 यांनी किडनी देऊन भावाला किडनी आजारापासून वाचवून जीवनदान दिले. मनीष कश्यप गेल्या एक ते दीड वर्षापासून नेफ्रोलॉजीस्ट डॉक्टर निखिल बडनेरकर यांच्या देखरेखीखाली उपचार व डायलिसिस घेत होते. 

First kidney transplant successful at Dr. Punjabrao Deshmukh Medical College and Hospital,
Dr. Punjabrao Deshmukh Medical College and Hospital, AMRAVATI

                श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  हर्षवर्धन देशमुख, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अनिल देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ पवन टेकाडे डॉ सोमेश्वर निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रियेचे नियोजन करण्यात आले. शस्त्रक्रिये चमू मध्ये यूरोलॉजीस्ट डॉ राहुल पोटोडे, डॉ विक्रम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली डॉ विशाल बाहेकर, डॉ राहुल घुले, डॉ श्वेता आठवले, नेफ्रोलॉजीस्ट डॉ निखिल बडनेरकर, डॉ स्वप्नील मोलके, डॉ प्रणित काकडे, बधीरीकरण तज्ञ डॉ विजया पाटील, डॉ शशि चौधरी, डॉ नंदिनी देशपांडे, डॉ मीनल कोकाटे, डॉ जयेश इंगळे, डॉ शिरीष माहोरे, डॉ रितेश म्हात्रे, डॉ श्रद्धा धाकुलकर, डॉ स्वप्नील नागे, डॉ निशा राठी, डॉ मधुरा अत्रे यांचा मोलाचा सहभाग होता. पाच तास चाललेली शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. तत्पूर्वी डॉ निखिल बडनेरकर नेफ्रॉलॉजिस्ट यांनी मनीषला किडनी ट्रान्सप्लांट हा यावरचा उत्तम पर्याय असल्याचे व बहिणीने किडनी दिल्यास आपणाला जीवनदान मिळू शकते असे सुचविले होते.  त्याप्रमाणे रुग्णाची तयारी करण्यात आली. रुग्णाचे व नातेवाईकांचे समुपदेशन, पोलीस पडताळणी, कायदेशीर बाबीची पूर्तता, डोनर मध्य प्रदेश निवासी असल्यामुळे मध्यप्रदेश सरकारची परवानगी मिळवणे व संपूर्ण फाईल पूर्ण करून प्राधिकरण समिती ऑथरायझेशन  कमिटी समोर सादर करून परवानगी प्राप्त करणे इत्यादी बाबी पूर्ण करण्यात ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेटर सतीश वडनेरकर यांची महत्त्वाची भूमिका होती. रुग्णालयाचे व्यवस्थापक डॉ श्रीकांत फुटाणे, ऋग्वेद देशमुख मेट्रन चित्रा देशमुख, मंजुषा नितनवरे यांचे शस्त्रक्रियेची संपूर्ण तयारी व नियोजन करण्यात मोलाचे सहकार्य लाभले.

Advertisement

                प्राधिकरण समिती अध्यक्ष डॉ अनिल देशमुख, अधिष्ठाता, सदस्य डॉ आरती कुलवाल सहाय्यक उपसंचालक अकोला, डॉ दिलीप सौंदळे सिविल सर्जन अमरावती, डॉ अविनाश लव्हाळे सेवानिवृत्त उपसंचालक, डॉ अनुपमा देशमुख आय. एम.ए. अध्यक्ष अमरावती, डॉ पवन टेकाडे एचओडी फॉरेन्सिक मेडिसिन, डॉ रामावतार सोनी एच.ओ.डी. पॅथॉलॉजी, डॉ शुभांगी वर्मा एच. ओ. डी. मेडिसिन विभाग, डॉ किशोर बनसोड एच. ओ. डी. फार्माकॉलॉजी विभाग यांनी रुग्ण व डोनर यांची संपूर्ण कागदपत्राची पडताळणी करून त्यांच्यासोबत मुलाखतीच्या माध्यमातून संवाद साधून सर्व बाबीची पडताळणी केली व शस्त्रक्रिया करण्याकरिता मान्यता दिली. शस्त्रक्रिया दरम्यान शल्यगृहात संध्या वाघमारे, शितल अंबरते, प्रियंका मैंद, सुमित्रा घाडगे, कल्याणी निरडकर, प्रतीक मालविया, मोहिनी गोहत्रे पुष्पलता बेहरड, राणी खेकडे अंकुश दळवी, विकास चरोडे, नीता श्रीखंडे यांनी काम पाहिले तर किडनी ट्रान्सप्लांट आय.सी.यू. मध्ये पुढील दहा दिवस डॉ सतविर कौर, श्रीमती. लीना ठाकूर, शिल्पा वानखडे, स्मिता वावरे, शशिकांत ढीवर, डेलिया मेघवा, पल्लवी कपळे, पल्लवी निस्वादे, त्रिशुला मनोहरे, अर्चना वानखडे हे कार्यरत राहणार आहेत. 

                    ही अत्यंत महागडी असलेली शस्त्रक्रिया शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत संपूर्ण मोफत करण्यात आली. तसेच शस्त्रक्रिया पूर्वी देखील बऱ्याच चाचण्या रुग्णालय स्तरावर मोफत करण्यात आल्यामुळे रुग्णाला बराच दिलासा मिळाला.  रुग्ण व रुग्णांच्या कुटुंबीयांनी शस्त्रक्रिये बाबत समाधान व्यक्त केले आहे. किडनी ट्रान्सप्लांट सारखी अत्यंत अवघड शस्त्रक्रिया पाहिल्यांदा डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृति वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय  येथे यशस्वी पार पडल्याबद्दल श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भैय्यासाहेब उर्फ हर्षवर्धन देशमुख, संस्थेचे पदाधिकारी यांनी सर्व तज्ञ डॉक्टर चमूचे, नर्सिंग स्टाफ, कर्मचारी तसेच महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page