यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना ABC ID /APAAR ID तयार करण्यासाठी आवाहन
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील शैक्षणिक वर्ष २०२४ -२५ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्याथ्यांनी आपले एबीसी आयडी – शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट्स आयडी (ABC ID – Academc Bank of Credits –- अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट) / अपार आयडी – ‘स्वयंचलित स्थायी शैक्षणिक खाते नोंदणी’ (APAAR ID – Automated Permanent Academic Account Registry) आयडी तयार करावे. तसेच तो तयार झालेला आयडी विद्यापीठाच्या वायसीएमओयु स्टुडंट अॅप (YCMOU Student App ) मध्ये येत्या दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अद्ययावत करावा असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आलेले आहे.
केंद्र शासनाने नवीन ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२०’ च्या अनुषंगाने एक विद्यार्थी – एक ओळख’ (One Nation, One Student ID – वन नेशन, वन स्टुडंट आयडी’ ) कार्यक्रम सुरु केलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून अपार आयडी म्हणजेच ‘स्वयंचलित स्थायी शैक्षणिक खाते नोंदणी’ (APAAR ID – Automated Permanent Academic Account Registry – ऑटोमेटेड परमनंट ॲकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री) ही भारतातील सर्व विद्यार्थ्यांसाठी निर्मिती केलेली एक विशेष ओळख प्रणाली आहे.
अपार (APAAR) ओळखपत्र (आयडी कार्ड) जारी करण्यासाठी भारत सरकारने शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट्स (ABC – Academc Bank of Credits बँक) ची स्थापना केली आहे, जे शैक्षणिक पूरक नोंदवही (एज्युकेशनल इकोसिस्टम रजिस्टर) म्हणून काम करते. विद्यार्थी प्रमाणपत्रे, डिप्लोमा, पदव्या, प्रशिक्षण तपशील आणि सह-अभ्यासक्रम, विविध यश – प्राविण्यांसह त्यांचे शैक्षणिक क्रेडिट डिजिटली व्यवस्थापित करण्यासाठी, संचयित करण्यासाठी आणि प्रवेश मिळविण्यासाठी शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट्स (ABC) चा एक १२-अंकी कोड ओळखक्रमांक (आयडी) मिळवू शकतात.
ज्यामुळे विद्यार्थी वेगवेगळ्या संस्थांमधून अभ्यासक्रम करू शकता आणि त्यांच्यामध्ये मिळवलेली क्रेडिट्स हस्तांतरित करू शकता. अपार (APAAR) आयडी हा आजीवन शैक्षणिक पासपोर्ट म्हणून देखील काम करतो.
यासंदर्भात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या असे निदर्शनास आले आहे की शैक्षणिक वर्ष २०२४–२५ मध्ये विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या पदवी स्तरावरील द्वितीय / तृतीय वर्ष व पदव्युत्तर स्तरावरील द्वितीय वर्षातील काही विद्यार्थ्यांचे एबीसी आयडी – शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट्स आयडी (ABC ID – Academc Bank of Credits – अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट) विद्यार्थ्यांनी तयार केलेले नसल्यामुळे विद्यापीठाच्या डिजिटल पोर्टल (Digital University Portal) वर त्याची नोंद झालेली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कालावधीमध्ये क्रेडीट हस्तांतरण (Credit Transfer) व इतर शैक्षणिक सुविधा प्राप्त होणार नाही.
त्या पार्श्वभूमीवर अशा सर्व विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या वतीने आवाहन करण्यात येते की त्यांनी आपला आधार क्रमांक व या आधारशी जोडलेल्या (लिंक) भ्रमणध्वनी क्रमांकाच्या सहाय्याने https://www.abc.gov.in/ या लिंकद्वारे एबीसी आयडी / अपार आयडी (ABC ID/APAAR ID) तयार करावा. तसेच तो तयार आयडी विद्यापीठाच्या वायसीएमओयु स्टुडंट अॅप (YCMOU Student App ) मध्ये अद्ययावत करावा.
त्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी सदर अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करावे. त्यात स्वत:चा कायम नोंदणी क्रमांक (पीआरएन-PRN) व जन्मतारीख नोंदवून अपडेट एबीसी आयडी (Update ABC ID) या बटनावर क्लिक करून एबीसी आयडी (ABC ID) अपडेट करावा. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी आपला एबीसी आयडी / अपार आयडी (ABC ID/APAAR ID) यापूर्वीच तयार केलेला आहे, अशा विद्यार्थ्यांनीही या अॅपमधील सुविधेचा वापर करून एबीसी आयडी / अपार आयडी (ABC ID/ APAAR ID) अपडेट झाल्याची खात्री करून घ्यावी.
एबीसी आयडी (ABC ID) तयार करण्यासंदर्भातील महत्वाच्या सूचना विद्यापीठाच्या https://ycmou.digitaluniversity.ac/ या संकेतस्थळाच्या होमपेजवरील NAD Cell / APAAR-id, ABC-id या लिंकवर उपलब्ध आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेशीत पदवी स्तरावरील द्वितीय / तृतीय वर्ष व पदव्युत्तर स्तरावरील द्वितीय वर्षातील ज्या विद्यार्थ्यांचे एबीसी आयडी (ABC ID) अद्याप पर्यंत तयार केलेले नाही, अशा विद्यार्थ्यांनी येत्या दिनांक २५ नोव्हेंबर पर्यंत तसा आयडी (ID) तयार करावा. तो आयडी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अॅपमध्ये अद्ययावत (अपडेट) करण्याचे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे व विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या शेवटी केले आहे.