एनईपीनुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांची सुरुवात ७ डिसेंबरपासून
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने हिवाळी २०२४ सत्राच्या परीक्षा ७ डिसेंबर २०२४ पासून सुरु होणार असल्याची घोषणा केली आहे. या सत्राच्या परीक्षांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) नुसार, बीकॉम सेमिस्टर १ आणि बीएससी सेमिस्टर फर्स्टच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा आयोजित केली जात आहे.
परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ संजय कवीश्वर यांनी याबाबत माहिती दिली, तसेच विद्यार्थ्यांना योग्य तयारी करण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या आहेत. एनईपी अंतर्गत या सत्राच्या परीक्षा अधिक सुसंगत आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला चालना देणाऱ्या पद्धतीने आयोजित केल्या जात आहेत.
विद्यापीठाच्या वतीने या परीक्षा पारदर्शकतेने आणि शिस्तबद्धपणे घेतल्या जातील, अशीही माहिती डॉ कवीश्वर यांनी दिली.