गोंडवाना विद्यापीठाला ‘आव्हान २०२४’ राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबीरात प्रथम पुरस्कार
गडचिरोली : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आयोजित आव्हान 2024 या राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीरात गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला प्रथम पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
या शिबिरात गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी उल्लेखनीय कामगिरी केली. या यशस्वीतेचे श्रेय राष्ट्रीय सेवा विभागाचे संचालक डॉ श्याम खंडारे सर, गडचिरोली संघाचे संघनायक डॉ प्रमोद जावरे सर, डॉ सुषमा बनकर मॅडम तसेच डॉ प्रफुल राजुरवाडे आणि संपूर्ण राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक संघाला जाते.
गोंडवाना विद्यापीठ आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी ही अतिशय अभिमानाची बाब आहे. या यशाने आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात गडचिरोली जिल्ह्याची प्रतिष्ठा उंचावली आहे. प्रथम पुरस्कार प्राप्त झाल्याबदल गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ श्रीराम कावळे व कुलसचिव डॉ अनिल हिरेखन यांनी संपूर्ण राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक टीमचे अभिनंदन केले.