महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य युवा महोत्सवात शिवाजी विद्यापीठाचे भरघोस यश

कोल्हापूर : डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कृषी नगर, अकोला येथे ७ ते ११ नोव्हेंबर २०२४ दरम्यान आयोजित महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य युवा महोत्सव 2024-25 मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील शिवाजी विद्यापीठाचे ४२ निवडक विद्यार्थी, ७ व्यावसायिक साथीदार, २ संघ व्यवस्थापक, प्रशासकीय सेवक, सांस्कृतिक समन्वयक आणि संचालक विद्यार्थी विकास यांचा समावेश असलेला ५५ सदस्यांचा संघ या महोत्सवात सहभागी झाला होता.

Shivaji University's success in Maharashtra State Inter University Rainbow Youth Festival

या महोत्सवात नृत्य, नाट्य, ललित कला, संगीत आणि वाङ्मय या विविध कलाप्रकारातील एकूण २९ स्पर्धांमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या संघाने सहभाग घेतला होता. त्यांनी यामध्ये अभूतपूर्व यश मिळवत सर्वसाधारण उपविजेतेपद आणि संगीत विभागातील सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले. एकूण १३ बक्षिसे मिळवत शिवाजी विद्यापीठाने पुन्हा एकदा आपली श्रेष्ठता सिद्ध केली आहे.

Advertisement

विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची शक्ती:

शिवाजी विद्यापीठाच्या या यशात कुलगुरू डॉ डी टी शिर्के, प्र-कुलगुरू डॉ पी एस पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ आर डी ढमकले, अ‍ॅड स्वागत परुळेकर, कुलसचिव डॉ व्ही एन शिंदे, माजी संचालक डॉ पी टी गायकवाड, संचालक डॉ टी एम चौगले आणि सांस्कृतिक समन्वयक दीपक बिडकर यांचे महत्वपूर्ण मार्गदर्शन लाभले.

कलाप्रकारांमध्ये विशेष मार्गदर्शनासाठी नृत्य विभागात गणेश इंडीकर आणि आकाश लिगाडे; थिएटर विभागात शंतनू पाटील, संदीप जंगम, मयुरेश पाटील; संगीत विभागात ऋषिकेश देशमाने, नितीन शिंदे, सुमंत कुलकर्णी, चैतन्य देशपांडे; ललित कला विभागासाठी बबन माने, संग्राम भालकर, व वाङ्मय विभागासाठी प्रमोद पाटील यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले.

टीम व्यवस्थापनात हेमंत रकटे आणि डॉ उज्वला बिरजे यांनी टीम मॅनेजर म्हणून भूमिका निभावली तर विद्यार्थी विकास विभागाचे कर्मचारी विजय इंगवले आणि सुरेखा अडके यांचेही महत्त्वपूर्ण योगदान राहिले.

शिवाजी विद्यापीठाच्या संघाच्या या यशाबद्दल विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page