मतदानाच्या टक्केवारीत वाढीसाठी मतदारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी एमजीएम रेडिओवर दिलेल्या मुलाखतीत सर्व नागरिकांना मतदानाच्या माध्यमातून लोकशाही मजबूत करण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकारी स्वामी यांनी लोकशाहीच्या महोत्सवात सक्रिय सहभागाची गरज व्यक्त केली. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदार विक्रमी मतदान करतील.

मुलाखतीत स्वामी म्हणाले की, निवडणुकीच्या वातावरणात ३२ लाखांहून अधिक मतदार मतदानासाठी सज्ज आहेत. या मतदारांमध्ये जवळपास ४० हजार जेष्ठ नागरिक आणि २७ हजार दिव्यांग मतदार आहेत, ज्यांच्यासाठी घरून मतदानाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच, जिल्हाभरात ३२७३ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

Advertisement

लोकशाहीत मतदानाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी मतदानाची घटती टक्केवारी धोकादायक असल्याचे सांगितले व यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार जागृतीसाठी विशेष प्रयत्न होत असल्याचे सांगितले. निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचे अडथळे येऊ नयेत म्हणून आचारसंहितेचे काटेकोर पालन सुरू आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुलाखतीनंतर स्वामी यांनी एमजीएम विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीला भेट दिली. या भेटीत कुलगुरू डॉ विलास सपकाळ यांनी त्यांना ‘गवाक्ष’ नियतकालिकाचा दिवाळी अंक भेट दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page