यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) सोबत सामंजस्य करार

रोजगार र्निर्मिती संदर्भात ठोस पाउल

नाशिक : महाराष्ट्रात आगामी सहा महिन्यात पाच हजार नवीन रोजगार निर्मिती करण्याचे उद्दिष्ट्य यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने निर्धारित केले आहे. त्यासाठी ठोस व सकारात्मक पाऊल उचलत विद्यापीठाने भारत विकास ग्रुप (बीव्हजी), पुणे या विविध सेवा सुविधा कंपनी सोबत सामंजस्य करार केला आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळ सभागृहात विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे व भारत विकास ग्रुप इंडिया लिमिटेडचे अप्रेंटीसशिप विभागाचे प्रमुख रवी घाटे यांनी या संदर्भातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

यावेळी बोलतांना विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे यांनी सांगितले की येत्या सहा महिन्यात राज्यात पाच हजार नवीन रोजगार निर्मिती करण्याचे उद्दिष्ट्य यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने निर्धारित केले आहे. त्यामुळे रोजगाराच्या शोधात अंधारात चाचपडणाऱ्या युवकांसाठी हा सामंजस्य करार आहे. या करारामुळे विद्यापीठातून दूरस्थ शिक्षण पद्धतीने पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या व घेतलेल्या  विद्यार्थ्यांना आपापल्या रहिवासी क्षेत्राच्या जवळपास म्हणजे गाव – शहर किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी रोजगार – नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे, असे ते म्हणाले. विविध कामाचे स्वरूप असणारी दोन – तीन मिनिटांची व्हिडीओ क्लिप तयार करावी. त्या क्लिप्स इच्छुक संबंधित विद्यार्थ्यांना दाखवून त्या क्लीपसोबत संबंधित कामाची लिंक द्यावी. त्यावर क्लिक करून विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने संबंधित नोकरीसाठी सहज सोपा अर्ज दाखल करू शकेल, अशी सूचना देखील कुलगुरू प्रा सोनवणे यांनी याप्रसंगी केली.

Advertisement

भारत विकास ग्रुप इंडिया लिमिटेडचे अप्रेंटीसशिप विभागाचे प्रमुख रवी घाटे यांनी आपली कंपनी यांत्रिक घरकाम, लँडस्केपिंग आणि बागकाम, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल मेंटेनन्स, फॅब्रिकेशन सर्व्हिसेस, टर्न की सोल्यूशन्स, लॉजिस्टिक सपोर्ट आणि कोणत्याही संस्थेला आवश्यक असलेल्या अनेक सेवा सुविधा क्षेत्रात कार्यरत असल्याचे सांगितले. तसेच आगामी काळात कृषी, सौरउर्जा, इलेक्ट्रिक व्हेईकल आदी क्षेत्रात असलेल्या रोजगाराच्या विविध नोकरी सेवा संधींची माहिती त्यांनी दिली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा विस्तार राज्यभर आहे. त्यामुळे या विद्यापीठाद्वारे शिक्षण घेणाऱ्या राज्यभरातील विद्यार्थ्यांना नव शिकाऊ (अप्रेंटीसशिप), प्रशिक्षण (ऑन जॉब ट्रेनिंग) किंवा इंटर्नशिप पद्धतीने नोकरीची संधी देण्यात येईल. विशेष म्हणजे आवड, कल व पात्रता बघुन विद्यार्थ्यांची निवड केली जाणार असल्याचे घाटे यांनी सांगितले.  

याप्रसंगी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ जोगेंद्रसिंह बिसेन, वित्त अधिकारी डॉ गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, डॉ राम ठाकर (संचालक व्यावसायिक शिक्षण व कौशल्य विकास विद्याशाखा तथा नियोजन अधिकारी), डॉ जयदीप निकम (संचालक निरंतर शिक्षण विद्याशाखा), डॉ प्रकाश देशमुख (संचालक – विद्यार्थी सेवा विभाग), डॉ प्रा कविता साळुंखे (संचालक स्कूल ऑफ ऑनलाईन लर्निंग), प्रा नागार्जुन वाडेकर (संचालक मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखा), डॉ सुरेंद्र पाटोळे (वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा), डॉ चेतना कामळस्कर (संचालक – विज्ञान वि‌द्याशाखा), डॉ सज्जन थूल (मूल्यमापन विभाग), डॉ माधुरी सोनवणे (संचालक कृषी विज्ञान विद्याशाखा), सोमनाथ जाधव (अंतर्गत गुणवत्ता आणि आश्वासन केंद्र), भारत विकास ग्रुपचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख बाळासाहेब कंकराळे, व्यवसाय विकास प्रमुख प्रमोद पवार यांची प्रमुख उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page