सौ के एस के कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी वुशूमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेस पात्र
दोन विद्यार्थी राज्यस्तरीय वेटलिफ्टींग स्पर्धेस पात्र
विद्यार्थिनी मैदानी स्पर्धेसाठी पात्र
बीड : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व छत्रपती संभाजीनगर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय विभागीय वुशू क्रीडा स्पर्धेत सौ के एस के कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी निर्मळ विशाल विष्णू भंडाणे अभिषेक भरत या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे 60 किलो ते 65 किलो आणि 70 किलो ते 75 किलो या वजनी गटात प्रथम येण्याचा मान मिळवत राज्यस्तरीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धा नांदेड येथे होणार्या स्पर्धेत प्रतिनिधीत्व करण्याचा मान मिळवला.
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व छत्रपती संभाजीनगर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वेट लिफ्टींग क्रीडा स्पर्धेत सौ के एस के कनिष्ठ महाविद्यालय, बीड यांचे विद्यार्थी शिवामनी दिलदार बहीर 18 वर्षातील 67 किलो वजनी गटात व जैद रशीद सय्यद 19 वर्ष वयोगटातील 61 किलो वजनी गटात या दोन्ही खेळाडूंनी सुवर्ण पदकाची कमाई करत 8 ते 11 नोंव्हेंबर 2024 बालेवाडी, पुणे येथे होणार्या शालेय व राज्यस्तरीय वेटलिफ्टींग क्रीडा स्पर्धेमध्ये पात्र ठरले आहेत.
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे व जिल्हा क्रीडा विभाग, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत आदिती बाळू चव्हाण 100 मी हर्डल्स व सुमित राजेंद्र जाधव 800 मीटर रानिंग स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई करत छत्रपती संभाजी नगर येथे होणार्या विभागीय मैदानी स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
या यशाबद्दल संस्थेचे सचिव डॉ भारतभूषण क्षीरसागर, संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ दीपा क्षीरसागर, योगेश भैय्या क्षीरसागर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस व्ही क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ संजय पाटील देवळाणकर, पदव्युत्तर पदवी विभागाचे संचालक डॉ खान ए एस, डॉ सुधाकर गुट्टे, कार्यालयीन अधिक्षक डॉ विश्वांभर देशमाने तसेच क्रीडा विभाग प्रमुख डॉ भागचंद सानप, कमवि उपप्राचार्य डॉ नारायण काकडे, पर्यवेक्षक प्रा जालिंदर कोळेकर, डॉ शेख शकील, डॉ अमृतसिंग बिसेन तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.