राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग पुरुष व महिला स्पर्धेचे उद्घाटन
ज्योतिबा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाला विजेतेपद
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेचे दि २४ ते २६ ऑक्टोबर २०२४ रोजी सी पी अँड बेरार महाविद्यालयाच्या नवनिर्मित बॉक्सिंग रिंगवर रेशीमबाग क्रीडांगणावर यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. या बॉक्सिंग स्पर्धेत ज्योतिबा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपट पटकावले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग पुरुष व महिला स्पर्धेचे उद्घाटन सी पी अँड बेरार कॉलेज, रेशीमबाग मैदान येथे झाले. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी सी पी अँड बेरार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड अशोकराव बनसोड, प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण संस्थेचे विजयराव बनसोड, विशेष अतिथी चीटनवीसपुरा को-ऑ बँकेचे अध्यक्ष अजय लांबट, संचालक उल्हास दुरुगकर, गणेश पुरोहित, नागपूर महानगर पालिका बॉक्सिंग संघटना सचिव अरुण भुते, नागपूर बॉक्सिंग संघटना सचिव पोरूस कोतवाल, तर सी पी अँड बेरार कॉलेजचे प्राचार्य डॉ अरविंद जोशी, उपप्राचार्य डॉ जे के महाजन, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ निशांत तिपटे उपस्थित होते. संचालन डॉ प्रज्ञा निनावे यांनी केले.
विजेत्या खेळाडूचे नावे खालील प्रमाणे
मुली : वजन गट (४५-४८) संध्या सर्नागत, पोरवाल महाविद्यालय (५०-५२) वंशिका, जोतीबा महाविद्यालय (५२-५४) अंजली पिलवार, हिस्लॉप महाविद्यालय (५४-५७) हेमंती भुजाडे, ईश्वर देशमुख महाविद्यालय. (५७-६०) श्रुती झाडे, सी पी & बेरार महाविद्यालय.(६०-६३) तनिशा, राणी अग्निहोत्री महाविद्यालय. (६३-६६) युक्तिका गोतेफोडे, एस एन मोर तुमसर. (६६-७०) मानसी निमजे, साब्या महाविद्यालय. (७०-७५) वैदही डिबे, मोहता विज्ञान महाविद्यालय. (७५-८१) शिबा दांडेकर, एस एन मोर, तुमसर (८१ +) यशश्री शाखरे ईश्वर देशमुख महाविद्यालय. Best Boxer श्रुती झाडे, Best Challenger सायो मारुफी ईश्वर देशमुख महाविद्यालय.
मुले : (४६ -४८) सिद्धांत मोरे, संत गाडगेबाबा महाविद्यालय भुसावळ. (४८-५१ ) तेजस गोडसे जे ए ती, (५१-५४) तुषार भोयर, एस बी सिटी महाविद्यालय. (५४-५७) विशाल, जोतीबा महाविद्यालय (५७-६०) एकनाथ वरखाडे, एस एन मोर, तुमसर (६०-६३.५ ) अश्मित नेगी, जोतीबा महाविद्यालय (६३.५-६७) राजेश तरारे बा वानखेडे, (६७-७१) सूर्यदेव, जोतीबा महाविद्यालय. (७१-७५) करण, जोतीबा महाविद्यालय (७५-८०) सोनू त्यागी, जोतीबा महाविद्यालय.(८०-८६) तुषार ठकरान, वैनगंगा महाविद्यालय, साकोली. (८६-९२) राजेश, एम जे एफ उमरेड (९२+) जय तुशीर जोतीबा महाविद्यालय. Best Boxer तेजस गोंडसे, Best Challenger लकी श्रीवास्तव, चक्रपाणी महाविद्यालय.