श्री शिवाजी महाविद्यालयाचे ‘ज्ञानतीर्थ २०२४’ आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवात घवघवीत यश
महाविद्यालयाने सात पारितोषिक प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले
परभणी : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या संघाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ज्ञानतीर्थ २०२४ आंतर महाविद्यालतीन युवक महोत्सवात विविध कला प्रकारात एक सुवर्णपदक, तीन रौप्य पदक व तीन कास्यपदक प्राप्त केले.
शास्त्रीय गायन स्पर्धेत – अभिरूपा पैंजणे – प्रथम क्रमांक – सुवर्णपदक, कथाकथन वाड्मयीन स्पर्धेत विकास दळवी याने द्वितीय क्रमांक – रौप्य पदक, जलसा (सांघिक) कलाप्रकारात द्वितीय पारितोषिक रौप्यपदक, यामध्ये गाऊराज भालेराव, संगम वाघमारे, गणेश राजगुरे धीरजकुमार प्रधान, गौरव सोनटक्के कृष्णा लिंबेकर आदी सहभागी होते. वादविवाद (सांघिक)वाड्मयीन स्पर्धेत किशन जाधव व आदिनाथ काळबांडे यांनी सर्व द्वितीय क्रमांकाचे रौप्यपदक प्राप्त केले, त्याचबरोबर
समूहगीत – लोकगीत भारतीय (सांघिक)सर्वतृतीय क्रमांक कास्यपदक प्राप्त केले. यामध्ये अभिरुपा पैंजणे, वैष्णवी गिरी, आरती महामुने, कोमल जोंधळे, नैनजितकोर, श्रुतिका सोनटक्के सहभागी होते.
सूरवाद्य स्पर्धेत हरीश शहाणे याने सर्व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. तालवाद्य स्पर्धेत गणेश राजगुरे यांनी सर्व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. संघाने एकूण सात पारितोषिके प्राप्त करून श्री शिवाजी महाविद्यालयाच्या यशात सांस्कृतिक क्षेत्रातील मानाचा तुरा रोवला.
श्री शिवाजी महाविद्यालयाने या ज्ञानतीर्थ 2024 आंतर महाविद्यालय युवक महोत्सवामध्ये एकूण 26 कला प्रकारांमध्ये सहभाग घेतलेला होता. शास्त्रीय गायन,सुरवाद्य, तालवाद्य, चित्रकला, सुगम गायन भारतीय, सुगम गायन पाश्चात्य, व्यंगचित्रकला, पोस्टर पेंटिंग, कोलाज, रांगोळी, मेहंदी, जलसा, कवाली, पोवाडा, वक्तृत्व, कलात्मक जुळवणी, एकांकिका, विडंबन अभिनय, नक्कल, लावणी, कथाकथन, वादविवाद, मृदूमूर्तीकला, मुकाभिनय. स्थळछायाचित्रआदी कला प्रकारातही अनुष्का हिवाळे, वृषाली लव्हांडे, साक्षी कदम, ऋतुजा जोशी, श्रद्धा शर्मा, प्रिती चव्हाण, मोनिका गंगथरे, अर्पिता शिंदे, हरिओम घोलप महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागातील 26 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.
या विद्यार्थ्यास मार्गदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ प्रल्हाद भोपे, संगीत विभाग प्रमुख प्रा सविता कोकाटे, प्रा अमोल गवई, प्रा अंकुश खटिंग, डॉ माधव जाधव प्रा मयुरी शिंदे प्रा कृष्णा शिनगारे यांनी केले.
कलावंत विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल श्री शिवाजी महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख तथा मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ केंद्रीय कार्यकारणीचे सदस्य हेमंतराव जामकर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड सिनेट सदस्य तथा महाविद्यालय विकास समिती सदस्य नारायण चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बाबासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्य डॉ रोहिदास नितोंडे महाविद्यालयातील प्राध्यापक व प्रशासकीय वृंद यांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.