गोंडवाना विद्यापीठात वीर बाबुराव सेडमाके शहीद दिनानिमित्त व्याख्यान संपन्न

शहीद वीर बाबुराव सेडमाके व व्यंकटराव सेडमाके यांनी आदिवासी समाजामध्ये स्वाभिमान निर्माण केला- डॉ नरेश मडावी

गडचिरोली : आदिवासी अध्यासन केंद्र व पदव्युत्तर शैक्षणिक इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गोंडवाना विद्यापीठात वीर बाबुराव सेडमाके शहीद दिवसा निमित्त “आदिवासी क्रांतिकारक वीर बाबुराव सेडमाके :योगदान व इतिहास” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून डॉ नरेश मडावी उपस्थित होते.

मार्गदर्शन करतांना डॉ नरेश मडावी म्हणाले कि आदिवासींचे भारतीय मातृभूमीशी अतिशय जिव्हाळ्याचे सबंध रालीले आहे. मात्र भूतकाळाच्या अंधारात दडलेला त्यांचा इतिहास आजही अंधारात आहे. आदिवासी स्वभावानेच स्वातंत्र्य असल्यामुळे त्यांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध येताच आदिवासींनी अन्याय अत्याचार व शोषणाच्या विरोधात संघर्ष केला आहे. बाबुराव सेडमाके यांनी ब्रिटीशांच्या विरोधात केलेला उठाव हा स्वातंत्र्यासाठीचा उठाव होता. भारतात ब्रिटीश सत्तेची स्थापना झाल्यानंतर त्यांनी आदिवासींना आपल्या प्रभुत्वाखाली आणण्याचा प्रयत्न केला व त्यांच्या कडून आर्थिक लाभ मिळविण्याचा प्रयत्न केला.

त्यासोबतच त्यांनी आदिवासींचे धर्म परिवर्तन करण्याचे प्रयत्न केले. ब्रिटीशांच्या धोरणामुळे आदिवासींच्या स्वातंत्र्यावर निर्बंद येऊ लागले. त्यामुळे ब्रिटीशांच्या विरोधात आदिवासींनी मोठ्याप्रमाणात स्वातंत्र्यासाठी आदिवासींनी उठाव केले, मध्य भारतात बाबुराव सेडमाके व व्यंकटराव सेडमाके यांनी केलेला उठाव महत्वपूर्ण आहे.

Advertisement

ब्रिटीश सत्तेच्या स्थापनेपूर्वी आदिवासींचा इतर वर्गासी सबंध नगण्य होता. ब्रिटीशांची सत्ता भारतात स्थापन होताच आदिवासी भागातील नैसर्गिक साधन संपत्तीकडे ब्रिटीशांचे लक्ष केंद्रित झले. नैसर्गिक साधन संपतीचा उपभोग घेण्यासाठी ब्रिटिशांनी आदिवासींच्या जीवनात हस्तक्षेप केला. सावकार व्यापारी व अधिकारी यांनीही आदिवासींचे शोषण करणे सुरु केले या सर्वांना ब्रिटीशांचे समर्थन होते. बाबुराव सेद्मके व व्यंकटराव सेद्मके यांनी या सर्वांचा विरोध करून बलाढ्य ब्रिटीश सत्तेलाच आव्हाहन दिले. बाबुराव सेडमाके व व्यंकटराव सेडमाके यांनी आदिवासी समाजामध्येच नाही तर या भागातील जनतेमध्ये स्वाभिमान निर्माण केला. त्याना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली त्यामुळेच सर्व जाती धर्माची लोक बाबुराव सेडमाकेंच्या ब्रिटीश विरोधी उठवत सहभागी झाली होती असे प्रतिपादन प्रमुख वक्ते डॉ नरेश मडावी यांनी केले.

पुढे बोलतांना डॉ नरेश मडावी म्हणाले कि मध्य भारतात जवळ जवळ सर्वच क्षेत्रात आदिवासींनी मोठ्या प्रमाणात ब्रिटीशांच्या विरोधात उठाव केले. राजा शंकशहा, रघुनाथशहा, धुर्वाराव, गुंडाधूर, बाबुराव सेडमाके व व्यंकटराव सेडमाके यांनी ब्रिटीशांशी दिलेली झुंज व केलेले प्राणार्पण किरकोळ कारणासाठी झालेले नव्हते. ब्रिटिशांना मध्य प्रांतातून हाकलून देण्याची आदिवासी क्रांतीकारकांची जबरजस्त महत्वाकांक्षा होती.

कार्यकामाच्या अध्यक्षस्थानावरून बोलतांना इतिहास विभाग प्रमुख डॉ नंदकिशोर मने यांनी प्रतिपादन केले कि गोंडवाना विद्यापीठ परीक्षेत्रातील ब्रिटीशांच्या विरुद्ध झालेलेया उठावातील क्रांतिकारकांचा इतिहास अजून समोरे आलेला नाही त्या संदर्भातील संशोधन समोर येणे आवश्यक आहे. संशोधक विद्यार्थ्यांनी आदिवासीचा इतिहास समोर आणण्याचे काम युवकांनी करावे. प्रमुख अतिथी डॉ प्रिया गेडाम व डॉ प्रफुल नांदे उपस्थित होते, कार्यक्रमाला प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्याप्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ वैभव मसराम व आभार डॉ अतुल गावस्कर यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page