रायसोनी महाविद्यालयाच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
पुणे : जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, पुणेच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेश विभागाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डोमखेल, आव्हाळवाडी, वाघोली येथील 100 आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून शैक्षणिक साहित्य आणि उपहारांचे नुकतेच वितरण केले. हे वितरण जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे कॅम्पस डायरेक्टर डॉ आर डी खराडकर, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका वनीता कलाप, शाळा विकास समितीचे अध्यक्ष हनुमंत सातव यांच्या हस्ते करण्यात आले.
ही समाजसेवी उपक्रम पुणेच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेश विभागाच्या शिक्षक आणि सहायक कर्मचारी वर्गाच्या आर्थिक योगदानातून देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी वह्या, चित्रकला वही, रंगीत पेन्सिल, पेन्सिल, खोडरबर, आणि शार्पनर असे शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक बालू टेमगिरे, अपर्णा थोरात, पुणेच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेश विभागप्रमुख डॉ सुरेंद्र वाघमारे, डॉ अमोल भोई, डॉ सारिका खोपे, डॉ सुधीर हाते आदी उपस्थित होते.
डॉ आर डी खराडकर, कॅम्पस डायरेक्टर म्हणाले, पुणेच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेश विभागाने केलेली ही अत्यंत प्रशंसनीय सामाजिक जबाबदारी आहे. आम्ही नेहमीच समाजाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध आहोत. आम्ही जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याबरोबरच संगणकाचे मूलभूत प्रशिक्षण देण्यासाठी तयार आहोत.
शाळेच्या मुख्याध्यापिका वनीता कलाप यांनी जी एच रायसोनी ग्रुप आणि ई आणि टीसी विभागाने आमच्या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण केल्याबद्दल आभार व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, हा समाजसेवी उपक्रम जीएचआरसीईएम पुणेच्या समाज आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठीचे अत्यंत महत्वाचे पाहुल आहे. रायसोनी कॉलेजमधील उपलब्ध संगणक सुविधांचा वापर आणि त्याचे आवश्यक प्रशिक्षण आमच्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.